
आशिया चषक सामन्यात टीम इंडियानं अभिषेक शर्माच्या आक्रमक अर्धशतकाच्या बळावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा करत पाकिस्तानच्या संघाला हरवलं.
दुबई IND Beat PAK : आशिया चषकातील सुपर-4 फेरीचा दुसरा सामना येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम राखत सहा विकेटनं विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं अभिषेक शर्माच्या आक्रमक अर्धशतकाच्या बळावर हे लक्ष्य 4 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा करत पूर्ण केलं. यासह टीम इंडियानं आशिया चषकातील आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग चौथा सामना जिंकला आहे.
पाकिस्तानची आव्हानात्मक मजल : या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजीला येत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. पहिल्या 10 षटकांमध्ये त्यांनी फक्त 1 विकेट गमावत 91 धावा केल्या. यावेळी पाकिस्तान संघ 190 ते 210 धावा काढेल असं वाटत होतं. मात्र 20 षटकांअखेर त्यांचा डाव पाच बाद 171 धावांवर मर्यादित राहिला. संघाकडून सलामीवीर साहबजादा फरहांननं अर्धशतक झळकावत सर्वाधिक 58 धावा केल्या. याशिवाय सॅम अयुब (21) मोहम्मद नवाज (21) आणि शेवटच्या षटकांमध्ये फहीम अश्रफ (20) यांनी केलेल्या खेळीमुळं पाकिस्तानला आव्हानात्मक मजल मारता आली. गोलंदाजीत भारताकडून शिवम दुबेनं सर्वाधिक 2 तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र या सामन्यात महागडा ठरला. त्यानं चार षटकात 45 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.
टीम इंडियाची दमदार सलामी : पाकिस्ताननं दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाला सलामीवीर अभिषेक शर्मा (74) आणि शुभमन गिल (47) यांनी शतकी भागीदारी करत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. अभिषेक शर्मानं डावाच्या पहिल्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर षटकार मारत आपला इरादा स्पष्ट केला. या दोघांनी 9.5 षटकात 105 धावांची भागीदारी करत भारतीय संघाचा विजयाचा पाया रचला. मात्र यानंतर सूर्यकुमार यादव (0) आणि संजू सॅमसन (13) हे मधल्या फळीतील फलंदाज लागोपाठ बाद झाल्यानं संघ काहीसा अडचणीत आला. मात्र शेवटी तिलक वर्मा (30) आणि हार्दिक पांड्या (7) यांनी 26 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाजीत पाकिस्तान कडून हरीस रौफनं सर्वाधिक दोन तर अबरार अहमद आणि फहीम अश्रफ यांची प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
या सामन्यातही भारतीय संघानं केलं नाही हस्तांदोलन : यापूर्वी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघादरम्यान 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात हस्तांदोलनावरून झालेल्या वादानंतर या सामन्यात भारतीय संघ काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र सूर्यकुमार यादवनं नाणेफेकेच्या वेळीच आपली भूमिका स्पष्ट करत पाकिस्तानी कर्णधाराशी कोणत्याही प्रकारचा संवाद केला नाही. त्याचप्रमाणे सामना संपल्यानंतरही भारतीय फलंदाज तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या हे सरळ आपल्या पॅव्हेलियनकडे निघाले त्यांनी कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूशी हस्तांदोलन केलं नाही.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

