India vs England 3rd Test Match Highlights In Marathi- टीम इंडियाने क्रिकेट क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 434 धावांनी धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळवला आहे.
राजकोट- टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात 434 धावांची विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने इंग्लंडला या विजयी धावांचा पाठलाग करताना 39.4 ओव्हरमध्ये 122 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने इंग्लंडला चौथ्याच दिवशी पराभूत केलं. टीम इंडियाने या विजयासह इतिहास रचला. टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. यशस्वी जयस्वाल, कॅप्टन रोहित शर्मा, डेब्युटंट सरफराज खान आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा हे चौघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
🔹️टीम इंडियासमोर इंग्लंड फुस्स-
टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी होती. तर दुसरा डाव हा 430 धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला 557 धावांचं आव्हान मिळालं. मात्र इंग्लंडकडून एकाही फलंदाजाचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. इंग्लंडकडून मार्क वूड याने सर्वाधिक 33 धावा केल्या. चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर रेहान अहमद झिरोवर आऊट झाला. तर उर्वरित चौघांना 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. तर जेम्स एंडरसन 1 धावेवर नाबाद परतला. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव याच्या खात्यात 2 विकेट्स गेल्या. तर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन दोघांनी 1-1 विकेट घेतली.
🔹️टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार-
दरम्यान टीम इंडियाच्या विजयात सर्वांचंच योगदान राहिलं. मात्र कॅप्टन रोहितसह सरफराज खान, यशस्वी आणि रवींद्र जडेजा या चौघांनी निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या डावा टीम इंडियाची घसरगुंडी झालेली असताना जडेजा आणि रोहितने द्विशतकी भागदारी केली. तसेच या दोघांनी वैयक्तिक शतकी खेळी केली. रोहितने 131 आणि जडेजाने 112 धावा केल्या. तर सरफराजने पदार्पणातील दोन्ही डावात 62 आणि नाबाद 68 धावा केल्या.
त्यानंतर दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल याने या मालिकेतील सलग दुसरं द्विशतक ठोकलं. यशस्वीने नाबाद 214 धावांची खेळी केली. तर शुबमन गिल याने 91 धावांचं योगदान दिलं. तर सरफराजनेही 68 धावा जोडल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने घरच्या मैदानात 5 विकेट्स घेत टीम इंडियाला विजयी केलं.
🔹️टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात मोठा विजय-
🔹️टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
🔹️इंग्लंड प्लेइंग इलेव्हन-
बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.