बंगळुरू- टीम इंडियाने साखळी फेरीच्या ९ व्या सामन्यात नेदरलँडला पराभूत करत भारतीयांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. टीम इंडियाने विश्वचषकातील ४५ वा सामना १६० धावांच्या फरकांनी जिंकला आहे. या विजयाआधीच टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली आहे.
टीम इंडियाने नेदरलँडला पराभूत विश्वचषकात ९ वा विजय प्राप्त केला आहे. विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सर्वच क्रिकेट संघांवर विजय मिळवला. आज रविवारच्या विजयामुळे टीम इंडियाला गुणतालिकेत १८ गुण मिळाले आहेत. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या शतकाच्या जोरावर ४१० धावा केल्या. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड संघ ४७.५ षटकात 250 धावांवर ढेपाळला.
४११ धावांचा पाठलाग करताना नेदरलँडची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकात नेदरलँडला पहिला झटका दिला. कुलदीप यादवने कोलिनला ३२ धावांवर बाद केलं. तर मॅक्सला रविंद्र जडेजाने बाद केलं. आजच्या सामन्यात विराट कोहली व शुभमन गिलनेही गोलंदाजी केली. विराट कोहलीने स्कॉटला बाद केलं. विराटने एकदिवसीय कारकिर्दीत पहिला गडी बाद केला आहे. स्कॉट बाद झाल्यानंतर नेदरलँडच्या फलंदाजांची पडझड कायम राहिली. टीम इंडियाच्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने आजच्या सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. श्रेयस अय्यरने १२८ धावा केल्या. तर केएल राहुलने १०२ धावा कुटल्या. तर टीम इंडियाच्या तीन फलंदजांनी अर्धशतकीय खेळी खेळली. यामुळे टीम इंडियाने ४१० इतक्या धावसंख्येचा डोंगर उभारला.