
टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पराभूत करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीत आपल्या दुसऱ्या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे.
अहमदाबाद गुजरात- टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरूद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अडीच दिवसातच हा सामना जिंकला आहे. भारताने विंडीजवर 140 धावा आणि डावाने हा विजय साकारला आहे. भारताने विंडीजच्या 162 च्या प्रत्युत्तरात पहिला डाव हा 448 धावांवर घोषित केला. त्यानंतर टीम इंडियाने विंडीजला दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी 286 धावांची आघाडी मोडण्याआधीच गुंडाळलं. भारताने विंडीजला 146 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने एकतर्फी आघाडी घेतली.
टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी ड्रेसिंग रुममध्येच पहिला डाव 5 बाद 448 धावांवर घोषित केला. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या विंडीजला भारतीय गोलंदाजांसमोर धड 2 सत्रही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी विंडीजचं 45 ओव्हरमध्ये 146 रन्सवर पॅकअप केलं. टीम इंडियासाठी मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांनी विंडीजला ऑलआऊट केलं. रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कुलदीप यादव याने दोघांना आऊट केलं. तर वॉशिंग्टन सुंदर याने 1 विकेट मिळवली.
विंडीजसाठी दोन्ही डावात एकालाही अर्धशतक करता आलं नाही. विंडीजसाठी दुसर्या डावात एलिक अथानाजे याने सर्वाधिक 38 धावा केल्या. जस्टीन ग्रीव्स याने 25 रन्स केल्या. जेडन सील्स याने 22 धावांचं योगदान दिलं. तर इतर 5 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
त्याआधी टॉस जिंकून बॅटिंग घेणाऱ्या पाहुण्या विंडीजला भारताने पहिल्या डावात 162 रन्सवर ऑलआऊट केलं. सिराजने सर्वाधिक 4 तर बुमराहने 3 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. त्यानंतर टीम इंडियासाठी तिघांनी शतक झळकावलं.
केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने शतकं झळकावली. केएलचं कसोटी कारकीर्दीतील 11 वं तर मायदेशातील दुसरं शतक ठरलं. ध्रुवचं पहिलंवहिलं शतक ठरलं. तर जडेजाचं उपकर्णधार म्हणून पहिलं तर कसोटीतील सहावं शतक ठरलं. तसेच कर्णधार शुबमनने अर्धशतकी खेळी केली. भारताने अशाप्रकारे 448 धावांचा डोंगर उभा केला.
शुबमनच्या नेतृत्वात भारताचा तिसरा विजय…
दरम्यान भारतीय कसोटी संघाचा शुबमनच्या नेतृत्वातील विंडीज विरुद्ध मायदेशातील पहिला आणि एकूण तिसरा विजय ठरला. शुबमनने रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीपासून नेतृत्वाची धुरा हाती घेतली. शुबमनने कर्णधार म्हणून इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. त्यानंतर आता विंडीला पराभवाची धुळ चारली आहे. आता उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. भारताला हा सामना जिंकून विंडीजला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. तर विंडीजसमोर अंतिम सामना जिंकून मालिका बरोबरीत राखण्याचं आव्हान असणार आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

