बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.
नवी दिल्ली : १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी १६ सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला. या संघाच्या मधल्या फळीत सर्फराझ खानचा समावेश करण्यात आला. वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला.
https://x.com/BCCI/status/1832808224275517540?t=Z7sQU_IIoM6VKHwfyjsfqg&s=19
ऋषभ पंतचा संघात समावेश-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टीम इंडियात दोन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांना यात स्थान मिळालं आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतचा कार अपघात झाला होता. तेव्हापासून तो कसोटी संघाबाहेर होता. २०२२ मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
चार फिरकीपटूंचा समावेश-
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने चार फिरकीपटूंचा समावेश केला. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा संघात समावेश करण्यात आला. चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त मानली जाते. अशा परिस्थितीत जडेजा आणि अश्विन बांगलादेशच्या फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळं चार फिरकीपटूंचा समावेश केला.
मालिकेचं वेळापत्रक-
भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेशचा भारत दौरा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जाणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत, तर तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला