डिजीटल दबाव वृत्त
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने कुणबी प्रमाणत्र देताना सगेसोयऱ्यांचाही समावेश करावा, तसा कायदा मंजूर करावा तसेच मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे अधिवेशन त्वरित घ्यावे, आरक्षण अधिसूचना व मसुद्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला सुरवात करणार आहेत.
आज पत्रकार परिषद घेत त्यांनी त्यांची भूमिका मांडली. यावेळी ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी साल्हेर किल्ल्याजवळ घातपाताचा प्रयत्न झाल्याची शंका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.
भुजबळांना देण्यात आलेल्या धमकीवर बोलताना जरांगे म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळे पोलीस त्यांना द्या, त्यांना पोलीसांचे कपडे घाला. त्यांना कशाला कोण मारेल? म्हतारा माणूस आहे त्यांना कशाला कोण मारेल? त्यांना कोणत्याच जातीचा समाजाचा व्यक्ती धमकी देऊ शकत नाही.म्हताऱ्या माणसाची माया करण्याचे संस्कार पुरोगामी महाराष्ट्रावर आहेत.
पुढे बोलतना जरांगे म्हणाले की, आम्ही भीत नाहीत, तुझ्यासारखं कोणाला सांगत देखील नाहीत. ते स्वतःच्याच कार्यकर्त्याला सांगतात की, मला संरक्षण द्यायला सांगा. आम्हाला भीती असून आम्ही सांगत नाहीत. आमच्यासोबत असं सात वेळा घडलं, पण आम्ही सांगितलं नाही.
साल्हेर किल्ल्यावरसुद्धा आमच्या गाडीवर कोणाचा टॅम्पो आला आम्हाला माहिती आहे, पण आम्ही संरक्षण द्या किंवा घातपाताचा प्रकार आहे असं म्हणालो नाही. तुझ्यासारखे असे भंगार चाळे आम्ही करत नाही. हे सांगायचं नव्हतं पण त्यांनी काढलं म्हणून…
पोलीसांनी त्या ड्रायव्हरला पकडलं. तेव्हा त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की त्याला पिकअप घालायला सांगितल म्हणून…. मी हे खरं की खोटं तपासायला सांगितलं…. त्याच्याविरोधात आमची काही तक्रार नाहीये… पण याची चौकशी करा. मला मुद्दाम गाड्यांवर पिकअप घालायला सांगितलं असं त्या ड्रायव्हरने कोणाचं नाव घेत सांगितलं, त्याची चौकशी करा, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
जाहिरात