दिवा टर्निंग चाैक : दिवा टर्निंग चाैकातील जयेश वाइनबाहेर दाेन्ही बाजूने सायंकाळपासूनच तळीरामांची यात्रा भरते. दुकानाच्या डाव्या बाजूला असलेल्या गल्ली-बाेळात ५० ते १० तळीराम रस्त्यावरच पेग लावतात. चकणा, अंडा गाड्यांची तेथे व्यवस्था आहे दुकानाच्या उजव्या बाजूला असलेल्या पानटपरीवरच दारूसह, ग्लास, चकणा सर्व गाेष्टी ठेवलेल्या आढळून आल्या. भरचाैकात तसेच दिवा महोत्सव मैदानात तळीराम खाली बैठक लावून एकमेकांना चिअर्स करीत पेग लावत असल्याचे चित्र गुरूवारी सायंकाळी वाजता हाेते. दिवा चाैकातील तळीरामांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याने रस्त्याने येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे?
दिवा बस स्थानक समोर असलेल्या वास्तुशिल्पी कॉम्पलेक्सच्या तळमजल्यावर वाइन शॉप आहे. या वाइन शॉपीवर दिवसा ढवळ्या तसेच सायंकाळी पासून गर्दी उसळण्यास सुरुवात होते. दुकानाच्या समोर व मागील मैदानात असलेल्या मोकळ्या मैदानात जागेवर मांडी मारून मद्यापींचे फड रंगलेले असतात. त्यांच्यासमोरच चाट, अंडी उपलब्ध असल्यामुळे मद्यपींची सोय होते. या मार्केटमध्ये दूध डेअरी, इलेक्ट्रीकचे दुकान आदी गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आहेत. परिसरातील महिला, नागरिक दुकानांमध्ये खरेदीसाठी येत असतात. दिवा टर्निंग चौकात, ठाणे व वाशी स्थानकाकडेकडे जाणाऱ्या बसेसचा थांबा आहे. त्यामुळे अनेक महिला प्रवासी उभे असतात. त्यांच्यासमोर रस्त्यावरच मद्यपींची गर्दी झालेली असते, सकाळी १० वाजेपासूनच दुकान सुरू होताच मद्यपींचे येणे-जाणे सुरू होते. तर दुसरीकडे दिवसा विद्यार्थ्यांचीही पालकांची वर्दळ होत असते. रात्रीच्या वेळी मैदानात मद्यपींमध्ये वाद होणे, नवीन नसून गुरुवारी रात्री १० च्या सुमारास दिवा मोहोत्सव मैदानात पडीक टेम्पोला आग लावण्यात आली, हे या भागात नित्याचेच झाले आहे. असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे