
नवी दिल्ली- अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव आता उघड संघर्षात बदलला आहे. बलुचिस्तानमधील चाघी जिल्ह्यात अफगाण सैन्याने घुसखोरी करत भीषण गोळीबार केल्याने अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे. ज्यामुळे या भागात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दीर्घ काळ सुरू असलेल्या संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अफगाणिस्तानचे सैन्य पाकिस्तानी सीमेत घुसले असून दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याची बातमी समोर आली. हा संघर्ष इतका चिघळला आहे की दोन्ही देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती बनली आहे. चाघी हा तोच भाग आहे जो बलूचिस्तानात डूरंड लाईनजवळ स्थित आहे. डूरंड लाईन ज्याला अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने अवैध घोषित केले होते. इथूनच अफगाणी सैन्य पाकिस्तानात घुसल्याचे समोर आले. या गोळीबारात अनेक पाकिस्तानी सैन्य मारले गेले आहे. याबाबत पाकिस्तानकडून अधिकृत पुष्टी मिळाली नाही. चाघी हा तोच परिसर आहे जो बलुचिस्तानमधील ड्युरंड लाइनजवळ वसलेला आहे. याच ड्युरंड लाइनला अफगाण तालिबानने आता ‘अवैध’ घोषित केले आहे.
याच ठिकाणाहून अफगाण सैनिकांनी पाकिस्तानात घुसखोरी केल्याची खात्री झाली आहे. स्थानिक सूत्रांनुसार या गोळीबारात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. मात्र पाकिस्तानकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अफगाणिस्तानची तालिबान सरकार आता ड्युरंड लाइन स्वीकारण्यास तयार नाही. त्यांनी केवळ सीमा ‘अवैध’ असल्याचे म्हटले नाही तर क्वेटा आणि पेशावरसारख्या पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवरही दावा ठोकला आहे. तालिबानचा आरोप आहे की- पाकिस्तानचे सैन्य वारंवार त्यांच्या हद्दीत घुसखोरी करत आहे. या आरोपाला उत्तर देताना पाकिस्तानने म्हटले आहे की, तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) एकत्र येऊन पाकिस्तानी सैन्य आणि चौक्यांवर हल्ला करत आहेत. दोन्ही देशांमधील विश्वासाची दोरी आता जवळपास तुटली आहे असे दिसते.