तलाठी कार्यालयात कोणत्याही फेरफार नोंदीसाठी पैसे लागत नाही जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर…

Spread the love

तलाठी कार्यालयात कोणत्याही फेरफार नोंदीसाठी पैसे लागत नाही जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्याला त्याबद्दल पावती मागा किंवा लाचलुचत विभागात (ACB) तक्रार करा.

अशा लाचखोरांना धरून द्या, लाचेला बळी पडू नका!

तुमच्या हक्काचा, कष्टाचा, घामाचा, लेकरा बाळांच्या तोंडातील घास, पैसा कोणालाही फुकट देऊ नका.

कायदे आहेत, ते वापरले तरच ते जिंवत राहतील!

त्यासाठी फक्त थोडे वाचा, थोडी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करा, गूगल करा, युट्यूब करा, थोडीशी चर्चा करा, बिनधास्त प्रश्न विचारा!

लाचार होऊन जगू नका, या देशाचा स्वाभिमानी नागरिक व्हा,
गोरे इंग्रज गेले पण, काळ्या इंग्रजांचे गुलाम होऊ नका!

लाच देणं आणि लाच घेणं या दोन्ही गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. आपल्या आसपास असे कोणी असेल तर तात्काळ खालील पर्याय वापरा.

नागरिकांनी जाहिर आव्हान…जागे व्हा, आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांना जागे करा, लाचारी सोडा आणि कामाला लागा

● संकेतस्थळ- acbmaharashtra@mahapolice.gov.in :-

● ई-मेल- spacbthane@mahapolice.gov.in

● ऑनलाइन तक्रार अप्लिकेशन- acbmaharashtra.net

● टोल फ्री नं-१०६४

● दुरध्वनी क्र. ०२२-२०८१३५९८/२०८१३५९९

● व्हॉटस् अँप क्र:- ९९३०९९७७००

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page