आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका…..

Spread the love

आई – बाबा ज्याप्रमाणे मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात (Parents Health Care). लहानपणी जसं आपलं आरोग्य त्यांनी सांभाळलं. त्याच प्रमाणे वय वाढल्यानंतर मुलांनी आपल्या आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी (Monsoon). आई वडिलांचं वय वाढल्यानंतर त्यांना स्वतःच्या अनेक गोष्टी करायला कमी नाही (Health Tips). खाण्या पिण्याकडेही त्यांचं पुरेसं लक्ष नसतं. ज्यामुळे आरोग्याच्या निगडीत अनेक आजार शरीराभोवती घेरतात. शिवाय तब्येतही वारंवार बिघडते.

लॉन्जेविटी एक्सपर्ट प्रशांत देसाई सांगतात की, ‘आपल्या आई – वडिलांवर प्रेम करत असाल तर, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांना ३ गोष्टी कधीही खायला देऊ नका. यामुळे आई वडील वारंवार आजारी पडतील. शिवाय गंभीर आजार शरीराभोवती विळखा घालतील’

*साखरेचा चहा आणि बिस्कीट…*

तज्ज्ञांच्या मते, बऱ्याच लोकांना चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय घातक ठरू शकतं. एक कप चहामध्ये ३६ ग्रॅम साखर असते. यामुळे त्यांना इन्शुलीन रेझिस्टन्स, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्याऐवजी खाकरा, शेव मुरमुरा किंवा घरगुती नाश्त्यावर तूप घालून खाऊ शकता. यामुळे आरोग्याला फायदे मिळतील.

*व्हेजिटेबल ऑईल…*

बरेच जण आहारात व्हेजिटेबल ऑईलचा आहारात समावेश करतात. ज्यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डरची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईडची पातळी वाढते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याऐवजी त्यांना तूप आणि खोबरेल तेलाचा आहारात सामावेश करा.

*रेस्टॉरंटमधलं अन्न…*

वयस्कर पालकांना शक्यतो रेस्टॉरंटमधून किंवा बाहेरचं खायला देऊ नका. त्यात मीठ, साखर आणि पाम तेलाचा जास्त वापर होतो. त्यात आरोग्यदायी आणि पौष्टीक गोष्टी नसतात. त्याऐवजी घरातील अन्न खायला द्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page