
लांजा: स्विफ्ट कारने रिक्षाला समोरासमोर धडक दिल्याने रिक्षाचालक जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी शिपोशी मालवाडी येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची खबर शहानवाज बशीर सारंग (वय २७, रा.शिपोशी मालवाडी, ता. लांजा) त्याने लांजा पोलिसांना दिली. अस्लम अहमद लांजेकर हे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्रमांक (एमएच.०८ बीसी.०३८४) ही घेऊन केळवली ते शिपोशी असा चालला होता. शिपोशी मालवाडी या ठिकाणी वाटूळहून आलेल्या स्विफ्ट कारने क्रमांक (एमएच.०८.एम.४२५७) या रिक्षाला समोरासमोर धडक दिली. यामध्ये रिक्षा चालक अस्लम लांजेकर हे जखमी झाले.

अपघातानंतर लांजेकर यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या घटनेत रिक्षाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे या करीत आहेत.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर