
स्पर्धेला आमदार मा.श्री. शेखरजी निकम सर, मा. श्री .रोहनजी बने आणि मा.श्री. अभिजित शेट्ये यांची उपस्थिती…
क्विझ कॉम्पिटिशन स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात बुरंबी हायस्कूल तर आठवी ते दहावी गटात मीनाताई ठाकरे हायस्कूल अव्वल…
*देवरूख-* स्वस्तिक युवा प्रतिष्ठान देवरुख तर्फे निमंत्रित तालुकास्तरीय सामान्य-ज्ञान आणि बुद्धिमत्ता स्पर्धा आणि क्विझ कॉम्पिटिशन रविवार दिनांक २८/०९/२०२५ रोजी माटे- भोजने सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या अभिनव स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सामाजिक कार्यकर्ते श्री मदनजी मोडक , आशा ज्वेलर्सचे मालक श्री केशवशेठ नार्वेकर, माजी नगराध्यक्ष श्री निलेशजी भुरवणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर स्पर्धेत तालुक्यातील बारा शाळा लहान आणि मोठ्या गटात सहभागी झाल्या होत्या.
*सामान्य सामान्य ज्ञान – बुद्धिमत्ता लेखी परीक्षा* ५वी ते ७ वी गटात प्रथम क्रमांक अर्णव योगेश शिंदे,पी.एस.बने, द्वितीय क्रमांक पुर्वी लक्ष्मण बेले, पी.एस्.बने आणि तृतीय क्रमांक दिव्यराज योगेश शिंदे, जि.प.देवरुख नं. ४
८वी ते १० वी गटात प्रथम क्रमांक आदित्य खडके, पी. एस् बने, द्वितीय क्रमांक ओम विलास कनार,पी. एस्.बने द्वितीय चिन्मय प्रकाश टिपूगडे, पी.एस्.बने, तृतीय क्रमांक मुग्धा अरविंद कुलकर्णी, न्यू.इंग्लिश स्कूल, देवरुख
*क्वीझ कॉम्पिटीशन* मध्ये ५ वी ते ७ वी गटात प्रथम क्रमांक बुरंबी हायस्कूल, द्वितीय क्रमांक पी.एस्.बने, तृतीय क्रमांक जि.प.शाळा देवरुख नं.४. आणि तृतीय क्रमांक मीनाताई ठाकरे, साडवली ..तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक जि.प.कांगणेवाडी शाळेला देवून सन्मानित करण्यात आले.
८ वी ते १० गटात प्रथम क्रमांक मीनाताई ठाकरे, द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख, तृतीय क्रमांक निवे हायस्कूल, क्विझ कॉम्पिटिशन स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. सदर स्पर्धा उत्कंठावर्धक वातावरणात संपन्न झाली. स्पर्धेतील प्रत्येक फेरी रंगतदार होत चालल्याने दिवसभर शिक्षक पालक, नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागणार असल्याने तसेच विद्यार्थ्यांना बौद्धिक सक्षम करण्यासाठी स्वस्तिक तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारच्या सत्रात मा. आमदार शेखरजी निकम सर, माजी जि.प.अध्यक्ष श्री रोहनजी बने सर, माजी उपनगराध्यक्ष श्री अभिजित शेट्ये यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मा..श्री. निकम सरांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करताना स्वस्तिकने अशी बौद्धिक स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या संकल्पनेविषयी भरभरून स्तुती केली. क्विझ कॉम्पिटीशन स्पर्धेचे आकर्षक चषक कोकण कनेक्टचे मालक श्री गणेश खामकर यांनी देवून विजयी स्पर्धकांना सन्मानित केले. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वस्तिक युवा प्रतिष्ठानच्या सर्वच सदस्यांनी कठोर परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी घेणारं एक चांगलं व्यासपीठ मिळाल्याने तालुक्यातील पालकांची या आगळ्यावेगळ्या स्पर्धेविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*