
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग येथे जलजीवन मिशन योजनेच्या निविदा वाटपात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ह्यांनी ६०० कोटींची कामे अंधाधुंद पद्धतीने केली आहेत. ह्या भ्रष्टाचारात संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, लेखापाल श्रीमती. कदम, टेंडर क्लार्क अशा तिघांनी मिळून कामे वाटपाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माहिती स्वप्नील खैर यांनी केला आहे. ही सारी माहिती त्यांनी माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत उघड झाली आहे.
संबंधित ठेकेदाराची बीड कॅपेसिटी नसताना सुद्धा करोडो रुपयांची कामे देऊन ठेकेदारांना मोठे करण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता तथा अखिल भारत हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री स्वप्निल सुभाष खैर यांनी वारंवार याबाबत माहिती मागून ही माहिती उघड केली. यामध्ये अनेकांचे हात ओले झाले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच अनेक ठेकेदारांची नावेही त्यांनी उघड केली आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार करण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
२० नोव्हेंबर २०२३ पासून याबाबत वारंवार तक्रार करण्यात आलेल्या आहेत. १) प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग. २) कक्ष अधिकारी पापू- ०४. ३) संचालक राज्य पाणी व स्वच्छता विभाग बेलापूर. ४)मुख्य अभियंता पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ५) पाणी पुरवठा मंत्री ६) मुख्य सचिव ७) मुख्य मंत्री ८) उपमुख्यमंत्री ९) जिल्हाधिकारी १०) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी ११) लाचलुचपत विभाग रत्नागिरी १२) जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी ह्या सर्वांना तक्रारी करण्यात आलेल्या आहेत आज मितीस कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा तक्रारदार ह्यांनी प्रतिनिधी ह्यांना सदरची माहिती दिली. कारवाई होत नसल्याने पुढे कोणते पाऊल उचलणार असे विचारले असता श्री खैर ह्यांनी सांगितले की ह्यापुढे न्यायालयात जन हित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच अंमलबजावणी संचालनालय (ED) ह्यांच्या कडे लेखी तक्रार करणार आहे.
ठेकेदारांची नावे खालील प्रमाणे-
१) प्रशांत लाड २) अनिल मोतीराम चव्हान ३) प्रसाद आवळे ४) शिवरत्न कन्स्ट्रक्शन ५) देवेंद्र कासार ६) अमोल लाड ७) राजेश साळुंखे ८) समाधान जाधव ९) सुनील धर्मु नायक १०) दशरथ दाभोळकर ११) के. डी. कन्स्ट्रक्शन १२) अक्षय काटकर १३) धनंजय नायर १४) जितेंद्र भालेकर १५) एन. आर.एन. वरोटेक १६) अविनाश टोपरे १७) ऋत्विज घाग १८) अक्षय देवरूखकर १९) वर्दा प्रोजेक्ट (दापोली) २०)संजीव नायक २१) ड्रीम कन्स्ट्रक्शन २२) आदिशक्ती कन्स्ट्रक्शन २३) गौरव राजेंद्र घोसाळकर २४) चव्हाण कन्स्ट्रक्शन २५) मोहन मंगलू चव्हाण २६) भिवई कन्स्ट्रक्शन २७) महेश चंद्रकांत तावडे २८) अनुप गुणिजन २९) विनोद कन्स्ट्रक्शन ३०) अनिल बाबू राठोड ३१) विशाल शिंदे ३२) विजय पवार ३३) विजय झोरे ३४) मानस विकास जागुष्टे ३५) अमित सुभाष मांगले ३६) संदीप लक्ष्मण रहाटे ३७) रामवरादायनी कन्स्ट्रक्शन ३८) प्रमोद प्रकाश महाडीक