
पेढा मेकिंग मशीन आणि बासुंदी फिलिंग मशीनचा स्वामींच्या हस्ते शुभारंभ
वाशिष्ठी प्रकल्पाचे स्वामींकडून कौतुक
प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीसाठी दिले आशीर्वाद
चिपळूण- कोल्हापूर येथील कणेरी मठाचे मठाधिपती स्वामी काडसिद्धेश्वर महाराज यांनी आज दुपारी पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. हा प्रकल्प कोकणातील दुग्धक्षेत्राला चालना देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच दुग्धव्यवसाय हा जोडधंदा नसून तो आता मुख्य व्यवसाय बनला आहे, असे मतही स्वामी काडसिद्धेश्वर महाराज यांनी व्यक्त केले.
कणेरी मठाचे मठाधिपती स्वामी काडसिद्धेश्वर महाराज यांचे आज दुपारी वाशिष्ठी डेअरीच्या प्रकल्पावर आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर वाशिष्ठी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीत काडसिद्धेश्वर महाराज विराजमान झाल्यानंतर उपस्थितांनी त्यांचे दर्शन घेतले.
यावेळी महाराजांनी वाशिष्ठी डेअरीच्या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून दुग्धोत्पादन प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनांची माहिती घेतली. यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या वतीने प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते स्वामी काडसिद्धेश्वर महाराज यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाराजांनी वाशिष्ठी प्रकल्पाबाबत प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातील पेढा मेकिंग मशीन आणि बासुंदी फिलिंग मशीन या संपूर्ण स्वयंचलित यंत्रांचा स्वामी काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा वाशिष्ठी प्रकल्पाचे मार्गदर्शक सुभाषराव चव्हाण, उपाध्यक्ष सूर्यकांत खेतले, संचालक अशोक कदम, अशोक साबळे, गुलाबराव सुर्वे, सत्यवान म्हामुनकर, सोमा गुडेकर, सौ. स्मिताताई चव्हाण, सौ. नयना पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, संचालक महेश खेतले, संचालक प्रशांत वाजे, संचालक अविनाश गुडेकर, कु. स्वामिनी यादव, वैभव चव्हाण, सिकंदर नाईकवाडी, वाशिष्ठी डेअरीचे कन्सल्टंट आसिफ खान, व्यवस्थापक प्रदीप मगदूम यांच्यासह वाशिष्ठी डेअरी आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते