*देवरुख-* संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब,देवरुख या ठिकाणी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व राज्य संघटना खजिनदार व्यंकटेश्वरराव कर्रा व तालुका सचिव व प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब उपाध्यक्षा सौ. ॲड.पूनम चव्हाण,उपाध्यक्ष संदेश जागुष्टे,नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, क्लब सदस्या रुपाली कदम, पालक प्रतिनिधी नितीन गावाणकर,वसंत कुंभार,पिहु कांगणे,मैथिली थरवळ,स्वरा सुर्वे,प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमीत पवार, गायत्री शिंदे आदी उपस्थित होते. या बेल्ट ग्रेडेशन परिक्षेसाठी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब,आणि लायन्स तायक्वांडो क्लब संगमेश्वर या क्लबच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
*यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :*
*येलो* – कृष्णा गावाणकर, शर्विल कांगणे,तनय थरवल, स्वराज शिंदे, स्वानंदि कांगने,संस्कृती कांगने,अन्वय कोळवनकर, आरोह तांबे, शुभ्रा सुर्वे, यश तांबे, कौस्तुभ बोटके.
*ग्रीन* – ईशान भागवत, हर्षदा कुंभार, वरद शेट्ये,शौर्या पाटोळे.
*ग्रीन- वन* – सोनल शिंदे, यशराज कटके, पृथ्वीराज कटके, आदित्य चिपळूणकर,ऋतिक कांगने,वेद पटेल.
*ब्ल्यु* – मल्हार साने,नक्षत्रा शिंदे, वेदिका वाडकर.
*ब्ल्यू-वन* – आदित्य शिंदे, प्रथमेश शेट्ये,सोहम मालगुंडकर, केतकी मोहिरे, लक्ष्मी मोघे, श्रेया फाटक, वेदांत मसुरकर, सोहम पवार,ध्रुवा शिंदे, आर्या ईप्ते.
*रेड* – पूर्वा वनकर, दुर्गा मोघे, रीयांश थरवळ, शौर्य माळी, सोमांश सावंत, तनिष्का अनेराव, मंथन चव्हाण.
या सर्व यशस्वी तायक्वांडोपट्टुंना तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. सुभाष बने, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड,माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये,तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू ,टेक्निकल प्रमुख चिन्मय साने,क्लब सदस्या स्वाती नारकर, अनुजा नार्वेकर,अण्णा बेर्डे,दत्तात्रय भस्मे,सिनियर खेळाडू निखिल लाड,सौरभ वनकर, पंकज मेस्त्री सिद्धी केदारी, वेदांत गिडीये आदींनी शुभेच्छा दिल्या.