नेरळ: सुमित क्षीरसागर
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या २९ युरो आशिया इंटरनॅशनल वास्को ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत नेरळ येथील सन बुडोकॉन कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. अकॅडमीच्या ७ विद्यार्थ्यांनी १३ पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुलुंड येथील प्रसिद्ध कालिदास सभागृहात दिनांक ४ फेब्रुवारी रोजी २९ युरो आशिया इंटरनॅशनल वास्को ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नेरळ येथील सन बुडोकॉन कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता. तर अकॅडमीचे शिक्षक हिरामण गवळी व संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरा हिरामण गवळी हिने २ रौप्य पदक, कौशल सुनील गवळी २ रौप्य पदक, मानसी मिलिंद थवई १ सुवर्ण १ रौप्य पदक, ज्ञानेश्वरी रवी मसणे १ सुवर्ण १ रौप्य पदक, स्पुर्वा सावंत १ रौप्य १ कांस्य पदक, नील गार्मी १ सुवर्ण पदक , झारा शेख १ रौप्य १ कांस्य पदकाची कमाई केली आहे. या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जाहिरात