*sश्रीकृष्ण खातू / धामणी –केंद्र शासनामार्फत माध्यमिक व उच्चमाध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय कला- उत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी जिल्हास्तरीय कला उत्सव पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथे पार पडला. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक माध्यमिक विद्यालये सहभागी झाली होती. यामध्ये दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थी तीन कला प्रकारात सहभागी झाले होते. कु. प्रज्ज्वल महेश घडशी याने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक तर कु. आकांक्षा योगेश सप्रे हिने कथाकथन या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय कला- उत्सव पुणे येथे थेट जिल्ह्याच नेतृत्व केलं. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कु. प्रज्वल घडशी याने शिक्षणाचे महत्त्व सांगणारे सुंदर चित्र रेखाटून सर्वानाच भुरळ पाडली. तसचे कु. आकांक्षा सप्रे हिने ‘ भक्त प्रल्हाद’ या कथेच सादरीकरण करत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.. गतवर्षी याच राज्यस्तरीय स्पर्धेत एकपात्री अभिनयात कु. नियती महेश घडशी हिने राज्यस्तरावर जिल्ह्याच नेतृत्व केलं होत.. या सर्वांना विद्यालयाचे कला शिक्षक श्री. प्रदिप कृष्णा शिवगण सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांमधील कला गुण हेरून टते विकसित करण्याचे कौशल्य अवगत असलेलं शिवगण सर हे श्री. शिवगण सर हे स्वतः राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण पदक विजेते आहेत. उत्तम चित्रकार, शिल्पकार, अभिनेता, लेखक आहेत. या यशाबद्दल यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक शिगवण सर यांचे संस्था अध्यक्ष अशोक सरफरे उपाध्यक्ष राजाराम गर्दे व शांताराम भुरवणे सरचिटणीस दिलीप मोरे, सचिव शरद बाईत खजिनदार महेश जाधव संचालक दिनेश जाधव, सचिन मोहिते, ललितकुमार लोटणकर, मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले.