लायन्स क्लब संगमेश्वरच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संगमेश्वर वसतिगृहात शैक्षणिक साहित्य वाटप !..
*दिनेश अंब्रे /संगमेश्वर-* महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील गरजू मुले माध्यमिक उच्च माध्यमिक आयटीआय, सारख्या शिक्षण विभागात प्रामाणिकपणे शिक्षण घेत आहात, व अशा आदर्श वस्तीगृहातून घेतलेले शिक्षण व संस्कार भविष्यात तुम्हाला नक्कीच स्वावलंबी बनवेल व आयुष्यात यशस्वीपणे एक सुजाण नागरिक तयार होऊन आपल्या आई-वडिलांचे, वस्तीगृहाचे ,व शिक्षकांचे नाव लौकिक नक्की कराल असे संगमेश्वर येथील व्यापारी व लायन्स क्लब अध्यक्ष सुशांत कोळवणकर यांनी शैक्षणिक साहित्य वाटपात गौरव व आत्मविश्वास व्यक्त केला. संगमेश्वर तालुका उत्तर विभाग बौद्धजन शिक्षण प्रसार संघ संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह नावडी संगमेश्वर येथील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य कंपास पेटी, चित्रकला वया साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
या वसतीगृह संदर्भात सोई सुविधा, व्यवस्थापन निवास, पोषण आहार, गरजू मुलांच्या गरजा, इत्यादी बाबतची सविस्तर माहिती महेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक रूपानें दिली.
या प्रसंगी खेडेगावातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खाऊचे व वाढदिवसाचे साठवलेले पैसे जमा करून त्यांतून १२ मुलांना दप्तरे वाटप करण्यात आली. तसेच हॉटेल मैत्री पार्क मालक जितेंद्र सुतार यांच्या सौजन्याने मुलांना फळांचे वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते व पोलीस तपास साप्ताहिकाचे पत्रकार दिनेश आंब्रे यांनी गेली पंधरा वर्षे विविध उपक्रमातून संस्थेला केलेल्या सहकार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमात सहभागी असलेला रामपेठ येथील अन्वेश अभिजीत शेरे , व निढळेवाडी येथील जुई सुतार यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी श्रीकृष्ण खातू, अर्चिता कोकाटे, दिनेश अंब्रे यांनी येथील मुलांना अनुभव व उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संगमेश्वरचे व्यापारी,दानशूर व्यक्तीमत्व,व लायन्स क्लब अध्यक्ष सुशांत कोळवणकर, संगमेश्वरचे उप सरपंच विवेक शेरे, सामाजिक कार्यकर्त्या,अर्चिता कोकाटे,पोलीस तपस साप्ताहिकचे पत्रकार दिनेश अंब्रे, नेत्रा सुतार ,प्रकाश गमरे ,मोहिते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेंद्र जाधव यांनी केले, तर प्रकाश गमरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.