ठाकरे गटाची याचिका आज दाखल करून घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालं. केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला. मात्र सुप्रीम कोर्टानं आज याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला. त्यावर कोर्टाने त्यांना उद्या मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत येण्यास सांगितले आहे.
जाहिरात :