संगमेश्वर- प्रतिनिधी (दिनेश आंब्रे )- श्रीमती सुखदा संजय शिंदे तालुक्यातील लोवले गावची (खालची वठार) येथील प्रतिष्ठित नागरिक व अंगणवाडी सेविका तसेच गेली २० वर्षे विविध मंदिरात जाऊन संगीत गायन केलेले आहे.गायनाचे आवड माहेरी कोंड असुर्डे या गावी आई निशिगंधा जनार्दन पवार व वडील कै.जनार्दन सखाराम पवार यांनी बाळकडू पाजले पुढे काका श्री. मुरलीधर पवार दिलीप बंधू पवार यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. तसेच भाऊ हेमचंद्र व रवींद्र हे सुद्धा गायन व तबलावादक कलावंत आहेत.
त्यांची साथ मिळाली या अध्यात्मिक सहवासातून पुढे सासरी कै. संजय शिंदे (पती)यांचे उत्तम प्रोत्साहन लाभले होते.हुन्नहूनरी,जिद्द चिकाटी,मनमिळाऊ, प्रेमळ अशा निस्वार्थी स्वभावामुळे त्यांची आगळे वेगळे व्यक्तिमत्व उठून दिसते. काही वर्षांपूर्वी श्री. निनावी देवी मंदिर शनिवारच्या गटाला श्रीमती सुखदा शिंदे यांचा सन्मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सत्कार झाला होता.
नुकतेच त्यांनी नवरात्री उत्सवाच्या पर्वावर श्री देव गणपती मंदिर व श्रीदेवी माता मंदिरात जाऊन गायन केले.