छत्रपती शिवरायांची वाघनखं आणणार परत; सुधीर मुनगंटीवारांनी केला यूकेसोबत करार, नागरिकांचा जल्लोष…

Spread the love

“छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात परत आणण्यासाठी वनं व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंत्री उदय सामंत यांनी लडंन सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं लवकरच भारतात परत आणण्यात येणार आहेत.”

मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh :
छत्रपती शिवराय यांनी क्रूरकर्मा अफझल खानाचा कोथळा फाडलेली वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही वाघनखं परत आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंत्री उदय सामंत यांनी लंडनसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे ही वाघनखं आता भारतात आणण्यात येणार आहेत. लवकरच मंत्री सुधीर मुनगंटीवार हे ही वाघनखं घेऊन भारतात परतणार आहेत.

सुधीर मुनगंटीवार आणि उदय सामंतांनी केला करार –

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया अलर्बट संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. इतिहासकार ग्रॅन्ट डफ यानं ती भारतात आल्यानंतर साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराजांकडून बक्षीस मिळवंल्याचा दावा करण्यात येत आहे. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्रूरकर्मा अफझल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे ही वाघनखं भारतात आणण्यासाठी वनं आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंत्री उदय सामंत हे दोघं लंडनला गेली आहेत. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्यासाठी लंडन सरकारसोबत करार केला आहे. ही वाघनखं तीन वर्षासाठी भारतात आणण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं जवळून पाहता येणार आहेत.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार –

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनला पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं परत आणण्यासाठी करार केला आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांविषयी सविस्तर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूरकर्मा अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. क्रूरकर्मा औरंगजेब हा आलमगीर समजत होता. त्यामुळे त्यानं मराठी जनतेवर अन्याय केला. मात्र जेव्हा अन्याय वाढतो, तेव्हा कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष ईश्वर क्रूरकर्म्यांचा नाश करण्यासाठी पाठवतो, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page