मंत्रिपद न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा; ऐनवेळी मंत्रीपदाच्या यादीतून माझं नाव कुणी कापलं; सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल…

Spread the love

*नागपूर-* राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला असून, रविवारी महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान यावेळी अनेक जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आलं आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश आहे. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कालपर्यंत नाव असताना ते नाव कमी का केलं हे मला माहिती नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.

मी नाराज असण्याचं कारण नाही. मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष जे पद देतं त्या पदासाठी मी काम करतो. फक्त इतकीच इच्छा आहे की, मंत्रिमंडळात माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं इतकाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना ते नाव कमी का केलं हे मला माहिती नाही. बाकी मला याबद्दल काही माहिती नाही. मंत्री म्हणून मी कॅबिनेटमध्ये मी गोरगरिंबाचे विषय मांडायचे, आता विधानसभेत मांडेन, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, त्यांनाच सर्व माहिती असेल. त्यांना काही सांगितलं असेल तर मला उत्तर देण्याची गरज नाही नितीन गडकरी यांच्या भेटीबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “एका छोट्या भावाची मोठ्या भावासह होणारी ही भेट आहे. जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो. त्यांचं मार्गदर्शन उचित असतं”.

जेव्हा मी आणि चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला तेव्हा श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला होता. तेच मार्गदर्शन आता करण्यात आलं आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. विधानसभेत गोरगरिंबाचे प्रश्न मांडायचे हेच आता माझं पुढील ध्येय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढे ते म्हणाले, मी नाराज कधीच राहत नाही. काल जे आपल्याकडे होतं ते उद्या जाणार आहे. उद्या आपल्याकडे नाही ते परवा येणार आहे याची मला जाणीव आहे. ज्यांच्या कुटुंबातील मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो, आपण त्यांना मंत्री करु शकतो. आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील. पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page