जनशक्तीचा दबाव न्यूज | सुरेश सप्रे, देवरूख | सप्टेंबर १४, २०२३.
देश पातळीवरच्या मानवाधिकार संरक्षण संघटन संस्थेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी संगमेश्वर तालुक्यातील खाडी भागातील युवा नेते सुधीर चाळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. सुधीर चाळके हे प्रबोधन सैनिक गृहनिर्माण सहकारी संस्था उपाध्यक्ष व सुभेदार चाळके चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव पदी कार्यरत असून शिवसेनाच्या (शिंदे गट) युवासेनेचे उप तालुका प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष अमित द्विवेदी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश गिरी यांच्या सहमताने श्री. चाळके यांची सदर नियुक्ती झाली आहे. सुधीर चाळके यांचा युवा वर्गात चांगला जनसंर्पक असल्यामुळे ते या पदाला साजेस काम करतील असा विश्वास प्रदेश अध्यक्ष दिनेश गिरी यांनी व्यक्त केला. त्यावर “जनतेच्या हितासाठी सतत काम करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे” असे सुधीर चाळके यांनी माध्यमांना सांगितले.
चाळके यांचे शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख श्री. राजेश मुकादम, कसबा जि.प. गट विभाग प्रमुख श्री. महेश देसाई, तालुका संघटक श्री. पपू गायकवाड, तालुका प्रमुख श्री. प्रमोद पवार यांनी या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.