‘मुख्यमंत्रिपदासाठी अचानक नवीन नावं येऊ शकतात समोर’; विनोद तावडेंचं सूचक विधान…

Spread the love

महाराष्ट्राच्या राजकारणात विनोद तावडे यांचे नाव आहेच. शिवाय, भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातही विनोद तावडे यांचं नाव आहे. अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी अचानक नवीन नावं येऊ शकतात समोर’; विनोद तावडेंचं सूचक विधान…



मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महायुतीतील भाजप असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी काही विधानंही समोर आली आहेत. असे असताना आता ‘मुख्यमंत्रिपदासाठी अचानक नवीन नावं समोर येऊ शकतात’, असं सूचक वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे.

एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, ‘राज्यातील निवडणुकांनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल, हे ठरवतील. मुख्यमंत्रिपदासाठी अचानकपणे इतरही काही नावे येऊ शकतात. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग केला, तसा राज्यातही होऊ शकतो’, असेही त्यांनी सांगितले.

तसेच मनसेने आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यांनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसेबाबत आता परप्रातीयांचा मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे भाजपच्या मतांवर परिणाम होणार नाही. माहीमबाबत बोलायचे झाले तर लोकसभा निवडणुकीनंतर मनसेला काही जागांवर पाठिंबा दर्शविण्याचा विचार होता. जर सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत तर शिवसेना (उबाठा)चा उमेदवार निवडून येण्याची शक्यता होती. त्यानंतर आता आपल्या सर्वांसमोर जे चित्र आहे, ते स्पष्ट आहे.

राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडेंचं नाव-

महाराष्ट्राच्या राजकारणात विनोद तावडे यांचे नाव आहेच. शिवाय, भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातही विनोद तावडे यांचं नाव आहे. अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. तावडे हे सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारीही आहेत. सध्या तावडे आपल्या गृहराज्यातील निवडणुकीचा प्रचार करत आहेत. या सरकारवर जनतेचा विश्वास असल्याने राज्यात पुन्हा भाजपचे महायुतीचे सरकार येणार असल्याचे बोलले जात आहे.

एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाचा घेतला जाणार निर्णय..

महायुती यंदाची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल, हे ठरवतील. मुख्यमंत्रिपदासाठी अचानकपणे इतरही काही नावे येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page