संघर्षातून मिळविलेले यश आपल्याला शिखरावर घेऊन जाते- कवी अशोकराव लोटणकर

Spread the love

कोकण (शांताराम गुडेकर )
कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या.,लांजा या संस्थेच्या वतीने लांजा तालुक्यातील गुणवंत, यशवंत, विद्यार्थी- विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा नुकताच कुलकर्णी काळे छात्रालय सभागृह, लांजा येथे पार पडला.त्यावेळी मार्गदर्शक म्हणून कवी श्री.अशोकराव लोटणकर यांनी विद्यार्थ्याना संबोधित करताना म्हणाले,विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या धवल यशाने मी भारावून गेलो आहे.मला या क्षणी मी ही एक होस्टेलचा विद्यार्थी असल्याचा मला भास होतोय.आपण प्रत्येकजण या वयात संघर्षाला सामोरे जात असतो आणि म्हणून आपण आपल्या मनाला समजावून सांगितले पाहिजे की मी माझे करिअर करणे हे आद्य कर्तव्य आहे. विविध स्पर्धा परीक्षा असतात त्याची माहिती घेतली पाहिजे यामध्ये आर्थिक फरक किंवा तुलना करण्याचे कारण नाही. कारण ज्याने संघर्ष केलाय तो नक्कीच आपले करिअर घडवून दाखवितो.स्थलमानाने सहा पायऱ्या १) उत्कृष्ट नियोजन २) अंमलबजावणी ३) दृढ आत्मविश्वास ४) अथक परिश्रम, प्रयत्न, जिद्द ५) तीव्र स्मरणशक्ती ६) सजग राहाणी. शिक्षण हा शैक्षणिक प्रोसेसमधला कणा आहे. गतिमान आणि स्पर्धात्मक युगात आपण सक्षम बोल्ड इनफ टू फाईट डायनॅमिक वर्ल्ड. बदलत्या जगात आपण निर्भयपणे लढायला तयार असले पाहिजे.समाजामध्ये खूप मोठ्या गोष्टी करणारे समाजसेवक ही संकटाचे वेळी गडबडून जातात तर अगदी साधी लोकही वेळेचा सहज सामना करतात. जीवनात पॉझिटिव्ह अँप्रोच ठेवायला हवा.जीवन खूप सुंदर आहे त्यासाठी विविध साधनांचा व साहित्यांच्या वाङ्मयाचे वाचन करायला हवे. आपले व्यक्तिमत्व बहुरंगी करायचे असेल तर विविध गोष्टी, साहित्य, संगीत, कला, वाचन, लेखन यापैकी एखादा छंद लावून घ्यायला हवा. मराठीबद्दल मला आदर मानसन्मान आहे. मित्रांनो मोठेपण धन संपत्ती, पैसा, सोने नाणे यावर नसते तर त्या व्यक्तीची इतरांप्रती असलेली सजगता,आपुलकी, त्यांचेबद्दल चांगली मनोभावना या गोष्टी माणसाचे मोठेपण सिद्ध करते.अब्दुल कलामांची एक गोष्ट सांगताना मा.लोटणकर म्हणाले की, करपलेली रोटी मी खाल्ली कारण जर करपलेल्या रोटीबद्दल मी बोललो असतो तर तुझ्या आईला वाईट वाटले असते. म्हणून मी करपलेली रोटी मागून ती तशी रोटी मला आवडते असे कलामांचे वडिलांनी सांगितले. आईवडिलांना आयुष्यात कधीही विसरू नका.आयुष्यात आपण खूप शिकतो, नोकरी करतो, पैसा मिळवितो पण आईवडिलांना समजून घेत नाही आणि त्यामुळे शासनाने निर्णय केला की, ७/१२ वर वारस नोंदवितांना मुले जर आईवडिलांची सेवा करीत असतील तरच त्यांची नोंद वारस म्हणून त्यांचे संपत्तीमध्ये करावी.“आई दिव्याची वात बुझली तर मला वाचता येत नाही, वडील म्हणाले दिव्याची वात बारीक कर मला झोप येत नाही.“अशी आईचे जीवन वातीला योग्य वळण देण्यात जाते. वक्ता असा असावा की त्याचे जीवन संघर्षातूनच फुललेले असावे ही सजगता आपल्यात हवी.


सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रथम आलेल्या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच तालुक्यातील इयत्ता १० वी मध्ये ८० % व त्यापेक्षा जास्त गुण आणि इयत्ता १२ वी मध्ये ७० % व त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले विद्यार्थी व पदवी परीक्षेत ” ओ ” ग्रेड प्राप्त केलेल्या कुणबी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार तसेच इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि पदवी प्राप्त केलेल्या सभासद पाल्यांचा, शिष्यवृत्ती मिळवलेले विद्यार्थी आणि विशेष प्रावीण्य मिळविले व्यक्तींचा सत्कार समारंभ संस्थेने आयोजित केला होता. या सर्व विद्यार्थ्यांचा व विद्यार्थीनींचा सत्कार तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून Food Corporation Of India अन्न महामंडळ भारत सरकारमध्ये अन्न धान्य गुणनियंत्रण अधिकारी म्हणून निवड झाली त्याबद्दल विश्वेस नंदकुमार आंबेकर याचा विशेष सन्मान अशोकराव लोटणकर सर यांच्या हस्ते करण्यात आला.


विद्यार्थ्यांना अशोक लोटणकर व चंद्रकांत परवडी यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष विलास दरडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. प्रभाकर सनगरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संचालक गणेश जोशी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या, लांजाचे सर्व संचालक पदाधिकारी सर्व कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेतल्याचे नमूद करून चंद्रकांत परवडी यांनी तालुक्यातील यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून मन:पूर्वक अभिनंदन केले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी व्हावे ही कुणबी समाज्याची अपेक्षा आहे व ही अपेक्षा विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी पुरी करावी असे आवाहन चंद्रकांत परवडी यांनी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page