◼️ कोल्हापूर वन वृत्तीय स्पर्धेत रत्नागिरी (चिपळूण) वन विभागाला महिला चॅम्पियनशिप आणि १६ सुवर्ण पदके, ७ रौप्य पदके व ६ कांस्य पदके मिळवून वृत्तस्तरावर तिसरा क्रमांक पटकावला आहे. २७ व्या अखिल भारतीय वनक्रिडा स्पर्धेच्या अनुषंगाने खेलापूर वनवृत्तांतर्गत दि. २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वन्यजीव विभाग अशा ६ वन विभागांच्या एकूण २६५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
◼️ सदर स्पर्धा महासंचालक कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल जि. सांगली येथे पार पडल्या. पहिल्या दिवशी १६ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १००, २००, ४००, ५००, १५०० मी. धावणे, ८००, ४००, १५००, १०००० मी. चालणे, कॅरम व बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन इ. स्पर्धांचे समावेश होता. तसेच दुसऱ्या दिवशी ७ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कबड्डी, हॉलीबॉल, फुटबॉल, ४४०० रेलिंग इ. स्पर्धा होत्या.
◼️ या स्पर्धांमध्ये रत्नागिरी (चिपळूण) वनविभागाने यश प्राप्त केले असून अॅथलेटिक्स या क्रिडा प्रकारात रत्नागिरी वन विभागाच्या कु. श्रावणी प्रकाश पवार, वनरक्षक हिने १०० मी धावणे, २०० मी धावणे, ४०० मी. धावणे, १५०० मी. धावणे, ५००० मी धावणे या क्रिडा प्रकारांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तर ४०० मी. चालणे, ८०० मी. चालणे या क्रिडा प्रकारांमध्ये ८ सुवर्ण पदक प्राप्त करीता महिला चॅम्पियनशिप किताब पटकावला आहे. तसेच श्रीम. राजश्री कीर, वनपरिक्षेत्र अधिकारी वनक्षेत्रपाल यांनी बॅडमिंटन, एकेरी व दुहेरी, गोळाफेक, थाळीफेक या क्रिडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे तर ४०० मी. धावणे या क्रिडा प्रकारामध्ये रौप्य पदक व १०० मी. धावणे या क्रिडा प्रकारामध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. श्री. राजाराम रा. शिंदे, वनरक्षक यांनी ४०० मी. धावणे, १५०० मी धावणे, या क्रिडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे तसेच १०० मी. धावणे, २०० मी. धावणे, ५००० मी. धावणे, १५०० मी. चालणे, व गोळाफेक या क्रिडा प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त केले आहे. ८०० मी. धावणे, या क्रिडा प्रकारामध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. श्री. राजेंद्र रा. पाटील वनक्षेत्रपाल यांनी टेबल टेनिस या क्रिडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे त्याचप्रमाणे वैयक्तिक क्रिडा प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले आहे. श्री अनिल दळवी, वनपाल यांनी बॅडमिंटन या क्रिडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक तर कॅरम या क्रिडा प्रकारामध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. श्री. दत्ताराम सुर्वे, वनरक्षक यांनी २०० मी. धावणे या क्रिडा प्रकारामध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. श्री. आकाश कडूकर यांनी टेबल टेनिस या क्रिडा प्रकारामध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. श्रीमती सुरेखा जगदाळे, वनपाल यांनी ८०० मी. चालणे या क्रिडा प्रकारात रौप्य पदक मिळावले आहे.
◼️ सहभागी स्पर्धकांना उत्साह व प्रेरणा देण्याकरीता विभागातील श्री. प्रकाश ग. सुतार, वनक्षेत्रपाल रत्नागिरी, श्री. वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल दापोली, श्रीम. राजेश्री कीर, वनक्षेत्रपाल चिपळूण व श्री. राजेंद्र पाटील, वनक्षेत्रपाल सा.व. खेड हे अधिकारी स्वतः उपस्थित होते. त्यांनीही स्वत: ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तसेच पारितोषिक वितरण समारंभास मा. दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी हे उपस्थित राहिले होते.
◼️ सदर स्पर्धेकरिता मा. श्री. आर. एम. रामानुजम (भा.व.से.) मुख्य वनसंरक्षक (प्रा) कोल्हापूर, मा. श्री जे. पी. त्रिपाठी (भा.व.से.) महासंचालक, कुंडल विकास प्रशासन व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल व राखीव वन्यजीव विभागाचे मा. श्री. एन. एस. लडकत (भा.व.से.) वनसंरक्षक सह्याद्री व्याघ्र राखिव कोल्हापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
◼️ रत्नागिरी वन विभागतील खेळाडू विभागामध्ये हजर झालेतनंतर मा. दि.पो. खाडे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) व श्री. स. बा. निलख, सहाय्यक वनसंरक्षक यांनी केले. पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले यावेळी मा. दि. पो. खाडे वि. व.अ. यांनी सर्व खेळाडू यांना मार्गदर्शन करून पुढील वेळी नियोजन करून आणखी उत्कृष्ट कामगीरी व पदक विजेत्या खेळाडूंचे कौतूक केले आहे.