
मुंबई तील विलेपार्ले विभागातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत आणि शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
त्यांच्यासोबत शिवसेना शाखा क्रमांक ८३ चे शाखाप्रमुख नरेश सावंत, महाराष्ट्र नाथयोगी सेवा समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष भावेश राजपूत, शाखा क्रमांक ८२ चे उपशाखाप्रमुख राजाराम यादव, शिव वाहतूक सेनेचे सचिव कल्पेश बालघरे आणि शिव वाहतूक सेनेचे उत्तर मुंबई लोकसभा संघटक मुस्तकिम शेख यांचाही यात समावेश होता.
त्यासोबतच पनवेलचे महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने पनवेल राष्ट्रवादीच्या युवा सेलचे शहराध्यक्ष महेश सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धेश खानविलकर, उ.बा.ठा गटाचे उसरली विभागाचे शाखाप्रमुख विवेक घाणेकर, दीपक प्रभू, सुनिल पलसमकर यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय अध्यादेशातील चुकीमुळे शिष्यवृत्ती मिळूनही ती हातात पडत नव्हती. याबाबत तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच वर्षानुवर्षे पनवेल एसटी आगारात पदपथ विक्रेते म्हणून काम करूनही पदपथ विक्रेत्यांना ओळखपत्र मिळत नव्हते ते मिळवून दिल्याबद्दल त्यांनीही सरकारचे आभार मानले.
यावेळी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे तसेच शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे आणि शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश सोमण उपस्थित होते.
जाहिरात



