मा.आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते आर.एन.नगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
दिवा : दिव्यातील नागरिक हे ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहिले आहेत. माझ्या आमदारकीच्या निवडणुकीत दिवा शहरातून मोठ्याप्रमाणावर मताधिक्य मला मिळाले होते. या शहरातून ठाकरे कुटुंबाविषयी कायम निष्ठा असल्याचे निवडणुकांच्या माध्यामतून स्पष्ट झाले आहे असे मत कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांनी व्यक्त केले. युवासेनेचे अभिषेक ठाकूर यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना जनसंपर्क कार्यालय एन.आर. नगर दिवा पश्चिम चा उद्घाटन सोहळया प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की दिवा हि माझी जन्मभूमी असल्यामुळे दिव्यातील नागरिकांच्या प्रेमापोटी सर्वात जास्त आमदार निधी दिला होता.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, जिल्हासंघटक महिला कविता गावंड, सहसंपर्कप्रमुख कल्याण ग्रामीण अरविंद बिरमोळे, शहरप्रमुख डोंबिवली विवेक खामकर, उद्योगपती संजय म्हात्रे, जिल्हा युवा अधिकारी कल्याण प्रतिक पाटील, उपशहरप्रमुख दिवा सचिन पाटील, मा. नगरसेविका अंकिता पाटील, युवानेते सुमित भोईर, महिला उपशहर संघटक योगीता नाईक, प्रियांका सावंत, दिवा व्यापारी संघटना अध्यक्ष चेतन पाटील, वंचित बहुजन आघाडी दिवा शहर अध्यक्ष मिलिंद गवई, दिवा शहरातील पक्षाचे सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना उपस्थित होते. त्यावेळी दिवा शहरातील आगासन गावातील श्रीधर बेडेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.