
मिनी बसमधील 13 तर एस. टी बस मधील 6 जखमी, ट्रॅव्हल्स चालक गंभीर…
मकरंद सुर्वे : संगमेश्वर- मुंबई-गोवा महामार्गावर ओझरखोल (ता. रत्नागिरी) येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एस.टी. बस ( एम एच 20 बी एल 4038) व मिनीबस (एम एच 08 एपी4527)यांच्यात भीषण अपघात झाला. या धडकेत मिनीबसचा चालक गंभीर जखमी झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. रत्नागिरीहून चिपळूणकडे जाणारी एस.टी. बस आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी मिनीबस यांच्यात ही समोरासमोर धडक झाली. हा अपघात 5 वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघात इतका भीषण होता की मिनीबसचा पुढील भाग अक्षरशः चिरडला गेला. चालक जवळपास अर्धा तास गाडीत अडकलेला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, पोलीस आणि अपात्कालीन सेवांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर क्रेनच्या सहाय्याने चालकाला बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामचंद्र फेपडे ( 60), रघुनाथ दत्तात्रय पाठक, राजू चोचे ( 60,संगमेश्वर) अशी जखमींची नावे आहेत.

एस.टी. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मिनी बसमधील अडकलेल्या चालकाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहतूक पोलीस तपास करत आहेत. या भागात वारंवार होणारे अपघात पाहता प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबई गोवा हायवे वरील ओझरखोल येथे भीषण अपघात…
मुंबई गोवा महामार्गावरील ओझरखोल येथे मिनीबस आणि एस. टी यांच्यात सायंकाळी 5 वाजता भीषण अपघाता झाला. चिपळूणहून रत्नागिरीला येणारी मिनी बस आणि रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने जाणारी बस यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. अपघाताची भीषणता एवढी होती की मिनी बस चा दर्शनी भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. चालक यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. तो मिनी बसमध्ये अडकून पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर 1 तासाने त्याला बाहेर काढण्यात यश आले. अपघातात एकूण 19 जण जखमी आहेत. यामध्ये एस. टी मधील 6 जण तर मिनी बस मधील 13 जण जखमी झाले आहेत.

मुंबई गोवा हायवे चे ठेकेदार जीएम म्हात्रे यांच्या डायव्हर्जन बोर्ड चे फलक न लावल्याने भीषण अपघात…
मुंबई गोव्याचे ठेकेदार जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी हलगर्जीपणामुळे तसेच रस्त्यावर आली माती न हलवल्याने ओझरखोल येथे डायव्हर्जन ठेवण्यात आले होते. परंतु कोणताही बोर्ड सदर ठिकाणी लावण्यात आलेला नाही. सेफ्टी ऑफिसर यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक अपघात आजवर झालेले आहेत. मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे निदर्शनास येत आहे.ज्या ठिकाणी डायव्हर्जन आवश्यक होते त्या ठिकाणी ते न घातल्यामुळे हा अपघात झाला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात झाल्यानंतर ठेकेदार कंपनीला जाग आली असून आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

जखमींची नावे खालील प्रमाणे-
1) विजय विश्वनाथ प्रसादे (60, रामपेठ, संगमेश्वर),
2) अजय रामदास भालेराव (40, एस. टी. चालक, सध्या चिपळूण, मूळ जळगाव ),
3) रघुनाथ दत्तात्रय फाटक (34, कसबा, संगमेश्वर),
4) अमृता श्रीकांत साठे (52, चिपळूण, एस. टी बस)
5) आहरत संतोष सावंत (15, पाली)
6) आण्णा बाबासाहेब पवार (33, पाली, मराठवाडी, रत्नागिरी)
7) सुशील धोंडीराम मोहिते (35, वांद्री, संगमेश्वर)
8) सविता धोंडीराम मोहिते (65, वांद्री, संगमेश्वर)
9) सहारा हमीद फकीर (22, शेट्येनगर, रत्नागिरी)
10) केतन श्रीकृष्ण पवार (34, कुवारबाव, जागुष्ट कॉलनी, रत्नागिरी)
11) शेखर सतीश साठे (32, डिप्लोमा फायरमन, रत्नागिरी)
12) सिद्धार्थ गोपाळ सावंत (74, पाली, वळके,रत्नागिरी )
13) अनिरुद्ध शिवाजी धनावडे (53, मारुती मंदिर, रत्नागिरी)
14) अंकिता अनंत जोगळे (40, माखजन, संगमेश्वर)
15) वैशाली सिद्धार्थ सावंत (60, पाली वळके)
16) उमा आफ्रिन मुलानी (25, कसबा, संगमेश्वर)
मिनी बस चालक गंभीर असल्याने त्याला रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. तर अन्य दोघांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
