चीनमध्ये शिकले, भारतात लग्न केले, चीनची लेडी लुई बिहारच्या पोरावर झाली फिदा…

Spread the love

खगरिया शहरातील बाबूगंज येथे राहणारा राजीव कुमार हा गेल्या दहा वर्षांपासून चीनमध्ये राहत आहे. राजीव आणि त्याचे कुटुंब तेथे व्यवसाय चालवते. राजीव चीनमधील एका विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होता.

बिहार /14डिसेंबर 2023- बिहारचा मुलगा चीनमध्ये शिकत होता. शिकत असतानाचा चीनमधील एका मुलीवर त्याच जीव जडला. त्याने तिला प्रपोज केलं, तिनेही त्याला हो म्हटलं. त्यांचे प्रेम इतके फुलले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या घरून विरोध झाला. पण, देशाच्या सीमा त्यांच्या प्रेमा आड येऊ शकल्या नाहीत. कहर हे दोघे विवाह बंधनात अडकले. चीनची लेडी लुई आणि बिहारच्या राजीव कुमार यांच्य प्रेम कहाणीची सुरवात चीनमधूनच झाली.

बिहारमधील खगरिया येथे राजीव कुमार याने चीनमधील आपली मैत्रिण लुई डेन हिच्यासोबत अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेतले. सात आयुष्य एकत्र राहण्याची शपथ घेतली. भारतीय आणि चिनी जोडप्याच्या या लग्नात ढोल ताशांसह जबरदस्त आतषबाजी करण्यात आली. लाल रंगाचा पोशाख परिधान केलेल्या वधूनेही वरासोबत मनसोक्त डान्स केला.

खगरिया शहरातील बाबूगंज येथे राहणारा राजीव कुमार हा गेल्या दहा वर्षांपासून चीनमध्ये राहत आहे. राजीव आणि त्याचे कुटुंब तेथे व्यवसाय चालवते. राजीव चीनमधील एका विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होता. याच विद्यापीठात बीजिंगची रहिवासी असलेली लुई डॅन ही चीनची भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास या विषयातून पदवीला शिकत होती.

लुई डॅन आणि राजीव यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पदवी परीक्षेनंतर दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना लग्नाबद्दल सांगितले. दोघांच्याही कुटुंबीयांना समजवणं कठीण होतं. पण, नंतर घरच्यांनी होकार दिला. घरच्यांच्या संमतीनंतर राजीव आणि लुईने खगरिया येथील हॉटेलमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले.

लुई डेन ही 2016 आणि 2019 मध्ये टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. नवविवाहित जोडप्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, लग्न झाल्यानंतर खूप आनंदी आहोत. आम्हा दोघांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान, वधू लुई डेन म्हणाली की, भारतीय सून होण्याचा तिला खूप आनंद होत आहे. मला भारतीय चित्रपट आवडतात. ‘दबंग’ आणि ‘थ्री इडियट्स’ हे माझे आवडते चित्रपट आहेत. दिवाळी आणि छठ हे भारतीय सण खूप आवडतात असेही तिने सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page