861 पात्र संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी
मुंबई ( प्रतिनिधी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी यांच्या द्वारे देण्यात येणारी संशोधन अधिछात्रवृती ही मागच्या दोन वर्षापासून वितरित झालेले नाही. त्यामुळे संशोधक विद्यार्थी बार्टीकडून 2021 साठी पात्र असणाऱ्या 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थी आझाद मैदान येथे 20 फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत.
मागच्या एक महिन्यापासून संशोधक विद्यार्थी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत. बार्टीच्या सारख्या समान उद्देशाने स्थापित संस्था सारथी ही मराठा-कुणबी साठी व महाज्योती OBC प्रवर्गातील सर्व जातीसाठी या संस्थांनी 2021आणि 2022 वर्षातील पात्र असणाऱ्या सर्वच संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन आधीछात्रवृत्ती दिलेली आहे. मात्र बार्टी संस्थेने 2021 पासून अद्याप पर्यंत संशोधन अधीछात्रवृत्ती वाटप केलेले नाही म्हणून अनुसूचित जातीचे संशोधक विद्यार्थी अजूनही आधीछात्रवर्तीच्या प्रतीक्षेत आहेत त्यासाठीच्या शासन दरबारी व प्रशासनाकडे त्यांनी एक वर्षापासून पाठपुरावा केला आहे. आंदोलन करून, मोर्चा काढून निवेदने दिलेली आहेत. बार्टी संशोधक विद्यार्थ्यांमध्ये सारथी व महाजोतीच्या विद्यार्थ्यांना शासनाने ज्या पद्धतीने सरसकट फेलोशिप केली आहे त्याच पद्धतीने मागास SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. मागास SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार येणारा संशोधनाचा महागडा खर्च व शिक्षण महाग झाल्यामुळे त्यांच्या संशोधनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ( बार्टी ) यांच्या द्वारे देण्यात येणारी संशोधन अधिछात्रवृती खूप आवश्यकता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, शासन आणि प्रशासनाने फेलोशिप देऊन शिक्षणाचा मार्ग तात्काळ मोकळा करावा याच प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.