गुरु पौर्णिमेनिमित्त करण्यात आले आयोजन; सोनाली पाटणकर, अक्षता इंदुलकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती
रत्नागिरी- रत्नागिरी येथील नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या प्रमुख गुरु प्रणाली तोडणकर आणि त्यांच्या शिष्यांनी यंदाच्या गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून ‘श्री प्रभू रामचंद्र एक नृत्य कथा’ सादर केली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भरतनाट्यम या भारतीय नृत्य प्रकाराला चालना देणाऱ्या नृत्यार्पण कला अकादमीच्या वतीने दरवर्षी गुरु पौर्णिमेला नृत्यावर आधारित कार्यक्रम सादर केले जातात. यावर्षी प्रभू रामचंद्राची कहाणी प्रणाली तोडणकर आणि तीच्या शिष्या नृत्यगणांनी सादर केली. यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जीजीपीएसच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर आणि कणाद कोचिंग क्लासेसच्या संस्थापिका अक्षता इंदुलकर उपस्थित होत्या. दीप प्रज्ज्वलनाने सुरु झालेल्या या कार्यक्रमात प्रथम घुंगरू पूजन झाले. त्यानंतर विद्यार्थिनींनी ‘श्री प्रभू रामचंद्र एक नृत्य कथा’ सादर केली. यामध्ये ‘राम जन्मला ग सखी’, ‘आत्मारामा आनंद रमणा’, ‘श्री रामचंद्र कृपाळू’, ‘मोडू नको वचनास’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘कोण तु कुठला राजकुमार’, ‘सूड घे लंकापती’, ‘सेतू बांधा रे’ या गाण्यांवर नृत्य आणि अभिनयाचा अविष्कार सर्वांनी सादर केला आणि उपस्थितांची वाहवा मिळवली.
यामध्ये प्रणाली तोडणकर यांच्यासह अदिती घाणेकर, श्रावणी सावंत, संतोषी झगडे, वैदेही आंब्रे, अनन्या मगदूम, खुशी शिरधनकर, स्वरदा लोवलेकर, श्रुती शिंदे, अनिका करमरकर, प्रज्वला चवंडे, पायल शिवलकर, ईश्वरी खाडिलकर, स्वरा रसाळ, बिलवा रानडे, ओजस्वी बामणे, अन्वया अंबाडे, श्रेया चव्हाण, श्रुती किल्लेकर, ओवी साळवी, रुही शिवलकर, मनस्वी भाटकर, गायत्री नैकर, दिया आयरे, आभा भाटवाडेकर, खुशी आयरे, भूमिका गुरव, ज्ञानदा नातू, केतकी जोशी, आकांशा शिंदे, वरुणीका बोडके, संस्कृती सपकाळ, पूर्वी राणा, लक्ष्मी पवार, शुभ्रा आंब्रे, ऐशानी विचारे, स्वराली म्हेत्रे, सान्वी डाफळे, सान्वी मगदूम, मिहिरा कांबळे, त्रिशिका गायकवाड, तीर्था वैद्य, नीरजा नितोरे, वैष्णवी पवार, विहाना कदम, स्वरा बेतकर, भक्ती जोशी, आदी सहभागी झाल्या् होत्या. या नृत्य कथेला सतार साथ राधा भट यांनी केली तर निवेदन अनघा निकम- मगदूम यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अकादमी मधील विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आली तर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी श्रीमती सुप्रिया तोडणकर, आकाश तोडणकर, सिद्धेश धुळप आदी उपस्थित होते.