गुहागर : जे.एस. डब्ल्यू फाऊंडेशन व रत्नागिरी जिल्हा कला अध्यापक संघ यांचे विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला व हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. Success of Guhagar High School students in competition
या जिल्हास्तरीय चित्रकला व हस्तकला स्पर्धेत कु. समृद्धी सचिन मोहिते, समर्था मंदार मोरे, सिध्दी संतोष जाधव, सुकन्या संदिप मुकनाक, आस्था किरण मोरे यांना विशेष प्राविण्य देण्यात आले. तसेच कर्मचारी रवींद्र मालप यांना हस्तकलेत उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व चषक मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले. Success of Guhagar High School students in competition