ठाणे: निलेश घाग दिवा शहरातील शालेय व्यवस्थापनाचा दरवर्षी वाढत चाललेला मनमानी कारभार,शालेय गणवेश,पुस्तके अवाढव्य किंमत, दरवर्षी होणारी फी वाढ,शिक्षणाच्या नावाखाली चाललेली लूटमार थांबवण्यासाठी, तसेच आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या,पालकांच्या सोबत शालेय व्यवस्थापन करत असलेली फसवणूक २०२४ मध्ये होवू नये यासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दिनांक ३०/१२/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता.धडाकेबाज युवा प्रतिष्ठान दिवा शहर जनसंपर्क कार्यालय शिव साई महादेव मंदिर,श्लोक नगर फेस २ मुंब्रा देवी कॉलनी दातिवली रोड दिवा पूर्व येथे पालकांच्या सोबत बैठक घेवून चर्चा करण्यात आली..
या वेळी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे यांनी सांगितले की,आजची ही लहान चिमुकले विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे भविष्य आहेत.त्यांना चांगले शिक्षण हे मिळाले पाहिजे.त्यासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठान पालकांच्या विद्यार्थ्यांच्या सदैव सोबत खंभीर पणे उभी राहिल.खाजगी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षक पदवीधर असावेत.शालेय व्यवस्थापनाने फी वाढ करताना पालकांना विश्वासात घ्यावे.बुक,नोटबुक एकाच दुकानातून वाढीव किमतीने घेण्याची सक्ती करू नये.एक शाळा एक गणवेश लागू करावा किंवा किमान ५ वर्षासाठी गणवेश ठेवावा.आरटीई च्या विद्यार्थांना मोफत शिक्षणाच्या केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन शालेय व्यवस्थापनाने करावे.याबाबत सरकारनेही विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी प्रायव्हेट शाळांना नियमावली शक्ती करायला हवी.परंतु शासन करेल की नाही यात शंका आहे. कारण राजकीय लोकांच्या त्यांच्या नातेवाईकांच्या,त्यांच्या सोबत काम करणाऱ्यांच्याच जास्त शाळा आहेत.यासाठी आता आपल्या मुलांच्या साठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्व पालकांनी अन्याय विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. यावेळी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या सचिव
अश्विनी अमोल केंद्रे,उपाध्यक्ष रामपाल मौर्या,मनीषा ताई दाभाडे,धनश्री ताई महाडिक, सुशीला ताई रसाळ तसेच पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.
जाहिरात