रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र गणपतीपुळेचे वतीने अंगारकी चतुर्थीसाठी येणारे परजिल्ह्यातील भाविक तसेच सुरू झालेला मुसळधार पाऊस याचा विचार करता नेहमी प्रमाणेच आरोग्य विभागाचे वतीने वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
यावेळी पावसाचा विचार करता तसेच मा. प्रांत साहेब सन्मा. जीवन देसाई साहेब यांचे सुचणे नुसार पथकातील कर्मचारी वाढविण्यात आले होते या पथकाचे वतीने दिवसभरात 84 भाविकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. या मध्ये दोन अत्यवस्थ भाविकांचा समावेश होता. या पथकाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेश्वरी सातव मॅडम यांनी तसेच त्यांचे समवेत विस्तार अधिकारी श्री. श्रीशंकर केतकर, श्री. बिराजदार, tno श्रीम. शितोळे आरोग्य सेवक श्री कांबळे यानी भेट देऊन मार्गदर्शन केले व उत्तम नियोजना बाबत कौतुक ही केले. या पथका मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ मधुरा जाधव, आरोग्य सहाय्यक डॉ.परशुराम निवेंडकर, श्री.संजय बारिंगे, cho श्रीम. सावंत प्रा. आ.केंद्र वाटद, cho श्रीम. शिर्सेकर मालगुंड, आरोग्य सेवक श्री. किरण झगडे, श्री. संकेत काळसेकर, श्री कुणाल मांडवकर , मदतनीस श्रीमती. सांची गवाणकर, आशा सेविका श्रीम. सारिका गवाणकर, तसेच महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या नर्सिंग कॉलेज मधील प्रशिक्षणार्थी यांनी काम पाहिले.