
लांजा :- रत्नागिरी जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने नियोजित चक्काजाम आंदोलन रद्द करून त्याऐवजी लांजा येथे मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवार, दि. २४ जुलै रोजी घोषणाबाजी करत लांजा तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन शासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला.
संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग मानधन वाढ व अन्य विविध प्रश्नांसंदर्भात संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवार, दि. २४ जुलै रोजी राज्यात चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने लांजामध्ये
चक्काजाम आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, मनाई आदेश लागू असल्याने आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत महामार्गावर ठिय्या देण्याऐवजी जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध नोंदवला.

यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने लांजा तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांकडे निवेदन सादर केले. दिव्यांगांच्या मूलभूत गरजा, सवलती व योजनांची अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
