लांजा :- कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांना समायोजन करण्याबाबत राज्य शासनाने अंमलबजावणी न केल्याने १५ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी – कर्मचारी राज्य कृती समितीकडून देण्यात आला आहे .
‘आयटक’ या कंत्राटी नर्सेस संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे . दरम्यान , यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे . राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आरोग्य सेवा पदे भरण्यासाठी जाहिरात आणि भरतीप्रक्रिया सुरू केली आहे . मात्र , या प्रक्रियेत १० वर्षांपेक्षा अधिक सेवा करणाऱ्या आरोग्य अभियानामधील आरोग्य सेविका अधिकारी आणि कर्मचारी यांना डावलण्यात आले आहे . गेली काही वर्षे कंत्राटी आरोग्य कर्मचारी कायमस्वरूपी सेवेसाठी आंदोलन करत आहेत . आरोग्यमंत्र्यांनी त्यांना ३१ मार्च पूर्वी समायोजनाबाबत निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिले होते . पावसाळी अधिवेशनानंतर ठोस निर्णय घेण्याचे सांगितले होते . मात्र , शासनाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे . त्यात समायोजनाबाबत भूमिका स्पष्ट केली नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे . जिल्हाधिकारी , जि . प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .
जाहिरात
जाहिरात