मुंबई : तेव्हा प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन समुद्रात दगड टाकला तरी तो तरंगायचा. आता राजकारणात तेच झालंय. प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन दगड तरंगतायत आणि दगडच राज्य करतायत,” असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.रामटेक येथून उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी पायी निघालेली महाभारत यात्रा रामनवमी दिनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहचली. पायी चालत आलेल्या शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. रामटेक ते ‘मातोश्री’ पायी चालत येणे ही हिंमत आहे. ही जिद्द तुम्ही जिथून आला असाल तिथपर्यंत पोहोचवा. तुम्ही सगळे सोबत आहात हीच माझी ताकद आहे. मिंध्यांनी कागदावरचा धनुष्यबाण नेला, पण माझे कार्यकर्ते हेच माझे बाण आहेत आणि ते माझ्या भात्यात आहेत. हे केवळ बाण नाहीत तर ब्रह्मास्त्र्ा आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६
जाहिरात