वरिष्ठांपर्यंत मागण्या पोहोचवण्याची स्थानिक पोलीस पाटीलांची मागणी
संगमेश्वर- संगमेश्वर तालुका पोलीस पाटील संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी निवेदन आमदार शेखर निकम यांना दिले आहे. तसेच विविध मागण्या वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवण्याची विनंती निवेदनाद्वारे पोलीस पाटील संघटनेने आमदार शेखर निकम यांच्याकडे केले आहे
राज्यातील पोलीस पाटील हे पद शासन प्रशासन व जनता यांच्यामधील अत्यंत महत्वाचा दुवा आहे.. ऐतिहासिक काळापासून चालत आलेले हे पद आधुनिक काळातही गावात कायदा सुव्यवस्था व जातीय सलोखा राखण्यात अग्रेसर आहे. मात्र कामाचे स्वरुप पाहता त्यांना शाासनाकडून मिळणारे मानधन व इतर सुविधा पुरेशा नाहीत, यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे म.रा.गा.का. पोलीस पाटील संघाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या मागण्या प्रलंबित असे आमदार शेखर निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तसेच पोलीस पाटीलांच्या मानधनात वाढ करुन ते दरमहा किमान रुपये १८,०००/- मिळावे.
ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे. नुतनीकरण पहिल्या पाच वर्षानंतर पुढे कायमचे बंद करण्यात यावे.
शासनाकडुन पोलीस पाटीलांना व त्यांच्या कुटूंबियांना मेडिक्लेमचा लाभ मिळावा. निवृत्तीचे वय ६० वर्षावरुन ६५ वर्षापर्यंत करण्यात यावे. त्यांच्या निवृत्तीकाळापर्यंत कायम ठेवण्यात यावे. त्यांची पदे खंडीत करु नये, पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेल्या व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटीलांन निवृत्ती नंतर ठोस रक्कम मिळावी.प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा रुपये ३०००/- मानधनासोबतच मिळावेत.गृह व महसूल विभागातील पद भरतीमध्ये पोलीस पाटील अथवा त्यांच्या वारसांना पात्रतेनुसार प्राधान्य देण्यात यावे, शासनातर्फे पोलीस पाटीलांचा रुपये १० लाखाचा विमा उतरविण्यात यावा त्याचे हप्ते शासनातर्फे भरण्यात यावेत, आपिलांचे निकाल पोलीस पाटीलांच्या बाजुने लागूनही त्यांना पुन्हा पदभार देण्यास दिरंगाई केली जाते. ती टाळावी व त्यांना तात्काळ पदभार देण्यात यावा. तालुका प्रशासन भवनाच्या इमारतीमध्ये तालुका स्तरीय पोलीस पाटील भवन मिळावे.
आदी विविध मागण्यांचा शासन स्तरावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय व्हावा असे निवेदन देण्यात आले आहे.