
ठाणे: निलेश घाग ऑल पँथर सेना यांचे ठाणे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली निवेदन देताना संदीप जाधव ठाणे जिल्हा अध्यक्षकिरण वीर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुनीता शेंडगे ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष नेहा ससाणे कल्याण महिला अध्यक्ष संतोष भाऊ बनसोडे. आणि पँथर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते, अपघात घडल्यास जखमीला मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही परंतु स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणिमात्रा मध्ये असल्याकारणाने आपल्या भारत देशामध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे तसा एखादा कठोर कायद्याचे संरक्षण चालकाला नसल्यामुळे चालक हा केवळ स्वतःच्या जीवाच्या भीतीने अपघात स्थळा वरून पलायन करतो त्यासाठी आधी चालक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी आणि त्यानंतर हीट अँड रन हा नवीन कायदा रद्द करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
जाहिरात


