

संगमेश्वर : दिनेश अंब्रे-दि. ३१ ऑगस्ट- कोंडअसुर्डे (ता. संगमेश्वर) येथील ७ वर्षीय *सचिन विनीत खेडेकर* याला *“मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार २०२५”* हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
सचिन सध्या कोल्हापूर येथील *VIBGYOR स्कूल* मध्ये इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असून, गेल्या एक वर्षापासून SK स्केटिंग अकॅडमी*मध्ये प्रशिक्षक *श्री. सुहास कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. या काळात त्याने –
🏅 शालेय पातळीवर 3 पदक
🏅 तालुका पातळीवर 4 पदक
🏅 जिल्हा पातळीवर 1 पदक
🏅 लोकमत स्पर्धेत 1 पदक
अशा अनेक यशांची कमाई केली आहे.


Sachin Vinit Khedekar ने 2 वेळा 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स देखील आपल्या नावे केले आहेत –79 मिनिटांची नॉन-स्टॉप स्केटिंग मॅरेथॉन
1) United States of America Book of World Records…
2) Genius Indian Book of World Records
3) UN Book of World Records
या अपूर्व कामगिरीसाठी त्याचा गौरव २९ ऑगस्ट २०२५ रोजी छत्रपती राजर्षी शाहू स्मारक सभागृह, कोल्हापूर येथे करण्यात आला.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
