
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)
समाजसेवक अमोल केंद्रे यांनी ह्या पूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) व स्थानक प्रबंधक मनोज कुमार गुप्ता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्राद्वारे निवेदन दिले होते. परंतु प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्यामुळे आज वरिष्ठ पो.नि.आर.पी.एफ दिवा पोलीस ठाणे यांना पत्र देत रेल्वे प्रवाश्यांसाठी काही ठराविक मागण्या केल्या आहेत. समाजसेवक श्री.अमोल केंद्रे व सौ.अश्विनी केंद्रे यांनी दिवा ते सीएसटी रेल्वे लोकल सेवा (Diva to cst Local Railway) सुरु करावी अशी मागणी खुद्द मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

ठाणे स्थानका नंतर दिवा स्टेशन हे सर्वात गर्दीचे स्थानक आहे. दररोज लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. सकाळच्या वेळी होणारी गर्दी खूप मोठी असते. त्यामुळे रेल्वे मध्ये चढणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक प्रवाश्यांचा आपला प्राण गमवावा लागला असून. परिणामी नागरीकांच्या मनात रोष निर्माण होत आहे. असाच प्रवाश्यांचा रोषाचा २०१५ मध्ये प्रशासनाला करावा लागला होता आणि त्यातून हिंसक आंदोलन निर्माण झाले होते.

त्यानंतर दिवा स्थानकावर अपवाद वगळता थांबा मिळण्यास सुरुवात झाली. परंतु दिवा स्टेशन येथे सर्वच जलद मार्गाच्या लोकलला दिवा स्थांनकावर थांबा मिळणे गरजेचे आहे. तसेच मुंबई महानगर प्रादेशिक ठाणे विकास क्षेत्रात येणाऱ्या दिवा स्थानकावर अत्याधुनिक सोयी – सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वकष आराखडा तयार करावा अशी मागणी समाजसेवक समाज सेवक श्री.अमोल केंद्रे यांनी केली आहे. (Start local train service from Diva to cst – Demand of Amol Kendre एक महिना होत आला असून रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ प्रवाश्यांच्या सोयीच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक :२१ मार्च रोजी सकाळी १०:०० वा.दिवा दातीवली रोड ते दिवा स्थानक कार्यालयावररेल्वे प्रशासना विरोधात लक्षवेधी मोर्चा काढणार आहोत असे मत समाजसेवक श्री.अमोल धनराज केंद्रे यांनी व्यक्त केले.

जाहिरात :

