राज्यभर संप करण्याचा कर्मचारी संघटनेचा इशारा…
जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | सप्टेंबर १०, २०२३.
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. असे असले तरी आणखी ४ टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ११ सप्टेंबर पासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार आहेत. ११ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर संप केला जाणार आहे. याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर १३ सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात संप केला जाईल, असा इशारा एसटी कर्मचारी संघटनांनी दिला आहे.