
संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल पुलाजवळ काल संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात एस.टी. बस आणि प्रवासी मिनीबसची समोरासमोर जोरदार धडक होऊन सुमारे २० प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती. रस्त्याच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू असताना एस. टी चालकाच्या बेदरकारपणामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही दुर्घटना १७ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी आशिष प्रमोद विभते (वय ३८, रा. देवख्ख दत्तनगर, संगमेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मिनी बस (MH-08-AP-4527) ही चिपळूणहून रत्नागिरीकडे जात असताना, समोरून आलेल्या एस.टी. बस (MH-20-BL-4038) ने रस्त्याच्या वळणावर कंटेनरला ओव्हरटेक करत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनी बसला जोरदार धडक दिली. अजय रामदास भालेराव (४६, एस.टी. चालक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
एस.टी. बस चालक अजय रामदास भालेराव (वय ४६, रा. चिपळूण) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगात गाडी चालवत कंटेनर ओव्हरटेक केल्याने हा अपघात घडला. धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य⁸ रजिस्टर न्यूजपेपर
