प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. संतोष जैतापकर यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून व्यक्त केल्या शुभेच्छा.

जनशक्तीचा दबाव न्यूज | कोतळूक | फेब्रुवारी ०७, २०२३.
एस.एस. स्मृती विकास मंडळ पिंपळवाडी, कोतळूक आयोजित २ दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेला सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. संतोषदादा जैतापकर यांनी उपस्थित रहावे अशी कोतळूकवासीयांची विनंती कोतळूकमध्ये सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे श्री. संजयदादा आगीवले यांच्यामार्फत करण्यात आली होती. मात्र कामाच्या व्यस्त वेळापत्रकाप्रमाणे नियोजित कामानिमित्त बाहेर असल्याने मा. संतोषदादा सदर स्पर्धेच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही लोकभावनेचा सन्मान करत गुहागर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या श्री. अविनाशदादा माटल व श्री. मनोज दाफळे यांना कार्यक्रमस्थळी पाठवून संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच क्रीडा क्षेत्रात आपण करत असलेल्या कार्यास आवश्यक असेल ती सर्व मदत करू असे आश्वासन दिले.
मंडळाच्या वतीने श्री. संतोष जैतापकर यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमास उपस्थित दोन्ही अतिथींचे आदरपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांनी मा. श्री. संतोषदादा यांच्यावतीने सर्व स्पर्धकांना, सहभागी संघांना व आयोजकांना शुभेच्छा देत आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे स्पर्धेदरम्यान सहकार्य करण्याबाबत आश्वासित केले. यानंतर मा. श्री. संतोषदादांनी दूरध्वनीद्वारे स्पर्धेचे अतिशय उत्तम नियोजन करून स्पर्धा संपन्न केल्याबाबत मंडळाचे व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.