
दीपक भोसले/संगमेश्वर-
बाहेर जाऊन येतो असे सांगून गेलेले श्रीपत भिवा जुवळे (वय ५० वर्ष) हे सलग पाच दिवस जंगलात फिरत राहिले. एखाद्या सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल अशी ही चित्तथरारक कथा! रात्रंदिवस परिसरातील जंगले पोलिसांच्या मदतीने पालथी घातल्यानंतर श्रीपत जुवळे सुखरुप सापडले. जंगलातील हिंस्र; वन्य जीवाना न घाबरता श्रीपत जुवळे यानी ५ दिवस या जंगलात कसे काढले हे त्यानाही सांगता येइना!
श्रीपत जुवळे यांना शोधण्यासाठी ग्रामस्थांनी तुकड्या करून मोहीम राबवली त्या मोहिमेला यश येत श्रीपत जुवळे हे अखेर जंगलामध्येच कड्याच्या ठिकाणी सापडले.
ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने राबवलेली शोध मोहीम यश आल्याने ग्रामस्थांनी व नातेवाईकाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील शेम्बवणे जुवळेवाडी येथील श्रीपत भिवा जुवळे वय ५० वर्ष हे ३ ऑक्टोबर रोजी बाहेर जाऊन येतो असे सांगत घरातून बाहेर पडले होते. घरातून बाहेर पडलेले श्रीपत जुवळ हे परत न आल्याने नातेवाईकांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती.
श्रीपत भिवा जुवळे यांना शोधण्यासाठी ग्रामस्थांनी शोध मोहीम राबवली गेले पाच दिवस ही शोध मोहीम रात्रंदिवस सुरूच ठेवण्यात आले ग्रामस्थांनी संगमेश्वर जवळची नायरी, धामणी; कसबा,असुर्डे आदी गावामध्ये ही शोध मोहीम राबवली मात्र या शोध मोहिमेला यश येत नव्हते मात्र तरीही ही शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली.
अखेर पाच दिवसानंतर ७ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांच्या एका तुकडीला श्रीपत जुवळे हे कळंबत्ये जंगलामध्ये कड्याच्या ठिकाणी आढळून आले आहेत.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सि.टी. कांबळे आणि आव्हाड यांनी ग्रामस्थांना सहकार्य केले.