पाकिस्तानकडून ‘लंकादहन’; आशिया चषकात श्रीलंकेचं आव्हान संपल्यात जमा….

Spread the love

सुपर फॉर फेरीतील तिसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट संघात येथील शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्ताननं विजय मिळवला.

अबुधाबी PAK vs SL Match : आशिया चषकातील सुपर फॉर फेरीतील तिसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट संघात येथील शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेर पाकिस्तान धडपडत विजय मिळवत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलं आहे. तर या पराभवासह श्रीलंकेचा सुपर-4 फेरीतील हा दुसरा पराभव असून त्यांना अंतिम फेरी गाठणं जवळजवळ अशक्य झालं आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 133 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्ताननं पाच गाड्यांच्या मोबदल्यात 138 धावा करत सामना आपल्या नावावर केला.

*श्रीलंकेची फलंदाजी अपयशी :* या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघानं नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचा आमंत्रण दिलं. यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर कुशल मेंडीस एकही धाव न करता बाद झाला. यानंतर ठराविक अंतरानंतर श्रीलंकेच्या विकेट पडत गेल्या. परिणामी त्यांचा डाव निर्धारित 20 षटकांत 8 बाद 133 धावांवर मर्यादित राहिला. संघाकडून कमिंडू मेंडीसनं एकमेव अर्धशतक झळकावत सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याच्याशिवाय चरिथ असलंका (20), कुशल परेरा (15), वनिंदू हसरांगा (15) आणि शेवटी चमिका करुणारत्ने (17) यांनी काहीसं योगदान दिल्यानं सांघाला 133 धावांपर्यंत मजल मारता आली. गोलंदाजी पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं सर्वाधिक 3 तर हरीस रौफ आणि हुसेन तलत यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

*पाकिस्तानचा 18व्या षटकात विजय :* श्रीलंकेनं दिलेल्या 134 धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या पाकिस्ताननं संयमी सुरुवात केली. संघाचे सलामेवीर साहबझादा फरहान (24) आणि फकर झमान (17) यांनी पहिल्या विकेटसाठी 33 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली. यावेळी पाकिस्तानचा संघ हा सामना लवकर संपवेल असं वाटत असतानाच श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत पाकिस्तानच्या 12 धावा 4 विकेट घेत त्यांची अवस्था 4 बाद 57 अशी केली. मात्र यानंतर मोहम्मद नवाज (38) आणि हुसेन तलत (32) यांनी 58 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला 18व्या षटकात विजय मिळवून दिला. श्रीलंकेकडून गोलंदाजीत वनिंदू हसरांगा आणि महेश तीक्षणा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.

*श्रीलंकेचं आव्हान संपल्यात जमा :* या पराभवासह श्रीलंकेचा स्र्धेतील आव्हान आता संपल्यात जमा आहे. कारण सुपर-4 फेरीतील हा त्यांचा दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यातही बांगलादेशकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्यांचा एकच सामना शिल्लक असून 26 सप्टेंबर रोजी त्यांना भारताच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे जर श्रीलंकेला अंतिम फेरी गाठायची असेल तर शेवटचा सामन्यात भारताचा मोठ्या अंतरानं पराभव करावा लागेल. मात्र 24 सप्टेंबरला होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात बांगलादेशचा पराभव झाल्यास श्रीलंका संघ अधिकृतरित्या स्पर्धेतून बाहेर पडेल. तसंच भारतीय संघाचा फायनल मधील स्थान निश्चित होईल.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*

*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*

*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*

*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page