शेगाव- गजानन महाराज मंदिर धामणी यादव वाडी गेली तीन वर्ष शेगाव पालखीचे आयोजन करत आहेत . यावर्षी पालखीचे तिसरे वर्ष आहे . गजानन महाराजांच्या आशीर्वादाने महाराजांचे भक्त गोपीनाथ मधुकर यादव गेली अनेक वर्ष गजानन महाराजांची सेवा करत आहेत . तीन वर्षांपूर्वी यादव यांनी गजानन महाराजांचे भक्त यांच्या सहकार्याने शेगाव येथे पालखी मिरवणुकीचे आयोजन करत आहेत. सदरच्या पालखी मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात भक्त संगमेश्वर आजूबाजूच्या परिसरातून जातात. पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
▪️ शेगाव येथे दिनांक १०/१२/२०२४ रोजी शेगांव येथील शितलनाथ मंदिर ते श्री गजानन महाराज मंदिर सकाळी १० ते १२ पर्यंत पालखी मिरवणूक.
▪️( श्री गजानन महाराज संस्थान नियोजन प्रमाणे) श्रींच्या प्रगट स्थानावर पालखीचे आगमन होईल.
▪️नंतर१० मिनिटे विसावा घेऊन मिरवणूकिचे प्रस्थान होईल त्यानंतर १२ वा. पश्चिम द्वार मार्गे मंदिर मध्ये प्रवेश व सामाजिक पालखी,वीणेकरी, दिंडीप्रमुख यांचे स्वागत.
▪️नंतर महाराजांचे दर्शन व प्रसाद….
▪️दिनांक ११/१२/२०२४ रोजी शेगांव येथील श्रींच्या लिला स्थानांचे दर्शन.
▪️अशा स्वरुपात पालखी सोहळा संपन्न होईल.