श्रीकृष्ण खातू /धामणी – दरवर्षी रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांच्या विविध प्रकारच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा आयोजित करून खेडेगावातील होतकरू मुलांच्या अंगी असलेले खेळातील नैपुण्य व कौशल्य अजमावून पुढे त्यांना खेळात वाव मिळावा व त्यातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत हाच क्रीडा स्पर्धांचा खरा हेतू असल्याचे रत्नागिरी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संतोष खेराडे यांनी आयोजित कडवई प्रभाग स्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी शाळा आंबेड खुर्द नं.१ या ठिकाणी मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून, क्रीडा ध्वज फडकवून, तसेच क्रीडा ज्योत आगमनाने करण्यात आली. धामणी नं.१ शाळेतील मुलांनी बेटी हिंदुस्तान की या गाण्यावर लेझीम नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी शिक्षण विभागाचा हिवाळी क्रीडा स्पर्धा उपक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचा असतो. मोबाईलच्या जमान्यात मैदानावरचे खेळ मुलांनी खेळावेत , त्यासाठी सुसज्ज नियोजन करावं लागतं याचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. व आपल्या शिक्षण विभागाचं नावलौकिक करा. अशाप्रकारे नमूद केलं.
या प्रसंगी कृष्णाजी हरेकर माजी सभापती संगमेश्वर,चंद्रकांत फणसे, सरपंच आंबेड खुर्द, बबन कांबळे उपसरपंच आंबेड खुर्द, राकेश कांबळे अध्यक्ष शा. व्य. शापोआहार अधिक्षक संदेश पवार, प्रभागातील सर्व केंद्र प्रमुख, शिक्षक, पालक उपस्थित होते.
मोठा गट सांघिक व लहान गट सांघिक बक्षिसे चंद्रकांत फणसे सरपंच आंबेडकर यांच्या वतीने व वैयक्तिक बक्षिसे बबन कांबळे उपसरपंच आंबेडकर यांच्या वतीने देण्यात आली. जनरल ट्रॉफी लहान गट व मोठा गट तुरळ केंद्राने पटकावली.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन केंद्रप्रमुख भास्कर जंगम व मुख्याध्यापक कारभारी वाडेकर यांनी केले होते.
सर्व उपस्थित विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यासाठी भोजन व्यवस्था ग्रामस्थ आंबेड खुर्द यांच्या वतीने करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर सानप यांनी केले.