
चिपळूण : चिपळूणमधील प्रभागात आज २४ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतलेल्या प्रचार फेरीला स्थानिक नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा विश्वासाचे जिवंत प्रतीक ठरला.
या फेरीत महायुतीतील भाजपच्या उमेदवार सौ. रुही धिरज खेडेकर आणि शिवसेनेचे श्री. निहार हेमंत कोवळे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. स्थानिकांनी विविध समस्या मांडत, आगामी निवडणुकीत “बदल, विकास आणि प्रामाणिक नेतृत्व” यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली.
घराघरातून मिळालेला आधार, गल्ली-गल्लीतून उमटणारा सोबतचा आवाज आणि नागरिकांकडून मिळणारे जनआशीर्वाद यामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.
प्रभागाचा सर्वांगीण विकास, तरुणांना संधी, महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि मूलभूत सुविधांचा शाश्वत आराखडा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे उमेदवारांनी सांगितले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर